0
कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती पंचनाम्यात कुचराई केल्यास कारवाई

विनोद दळवी

ओरोस : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने करा. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी येथील बैठकीत दिली. 

कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृहात झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. यावेळी माजी आमदार गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्राशंत पानवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म्हेत्रे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्यासह विभागीय व तालुका कृषि अधिकारी, सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. 

के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ``अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजापेक्षा नुकसान जास्त आहे. शेतीचे नुकसान नेमके किती झाले आहे, हे समजण्यासाठी नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण झाले पाहिजेत.`` 

शेतीच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत, ते तातडीने पूर्ण करावेत असे सांगून के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ""शेतीचे नेमके नुकसान लवकरात लवकर समजण्यासाठी पंचनामे पूर्ण होणे महत्वाचे आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पंचनामे पूर्ण करावेत. काही अडचणी असल्यास त्या कृषी अधिक्षक, प्रांत किंवा तहसीलदारांना कळवाव्यात. कोणत्याही अधिकाऱ्याने कुचराई केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.'' 

केर गावासाठी दोन कोटींचा प्रस्ताव मंजूर
यावेळी आदर्श ग्राम योजनेसाठी दोडामार्ग तालुक्‍यातील केर या गावाचा दोन कोटी 10 लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा विषयीची प्रकरणे विमा कंपनेकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम, आत्मा तसेच कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT