Action On Tourism Professionals For Money Only  
कोकण

बंदर अधिकाऱ्यांवर आमदार वैभव नाईक यांनी केले 'हे' गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - बंदर विभागाकडून ऐन पर्यटन हंगामात कारवाईचा बडगा उगारला जात असून ही कारवाई केवळ पैशासाठीच होत आहे. गतवर्षी मेमध्ये पर्यटन व्यावसायिकांकडून लाखो रुपये घेण्यात आले असून त्याची यादी आपल्याकडे आहे. त्यांना समोर आणू का? तुमच्यासाठी पैसे घेणारे बंदर निरीक्षक होते, असा गंभीर आरोप करत आमदार वैभव नाईक यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांना खडेबोल सुनावले. 

येथील स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांवर बंदर विभागाने धडक कारवाई करताना अनधिकृतरित्या वापरले जात असलेले 17 सिलिंडर जप्त केले. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी येथील बंदर कार्यालयावर धडक दिली. या वेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, दिलीप घारे, लारा देसाई, सन्मेश परब, राजू मेस्त्री, तपस्वी मयेकर, प्रवीण रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

पैसे घेण्यासाठी कारवाईचा बडगा

पर्यटन हंगामात कारवाईचा बडगा उगारणारा बंदर विभाग इतरवेळी गप्प का असतो? आतापर्यंत किती व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर केले? किती जणांना बंदर विभागाने परवानगी दिली? परवानगी देण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्‍नांचा एकच भडिमार नाईक यांनी या वेळी केला. व्यवसाय हा नियमातच असायला हवा, अशी आमचीही भूमिका आहे; मात्र पैसे घेण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

दिशादर्शक बोया बसविण्याची कार्यवाही केव्हा ?

येथील समुद्रातील खडकाळ भागात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना दिशा समजावी, यासाठी दिशादर्शक बोया बसविण्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला; मात्र बंदर विभागाने अद्याप दिशादर्शक बोया बसविण्याची कार्यवाही केलेली नाही. परिणामी दोन महिन्यांपूर्वी एका मच्छीमाराची नौका खडकावर आदळून सुमारे 12 लाखांहून अधिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई कोण देणार, असा खडा सवाल आमदार नाईक यांनी केला. नौकांचे असेच अपघात होण्याची बंदर विभाग वाट बघत आहे का, असा प्रश्‍न हरी खोबरेकर यांनी केला. याबाबत सागरी अभियंत्यांना कळविले असल्याचे बंदर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 

पहिल्यांदाच बंदर निरीक्षक वर्दीत

येथील बंदर विभागाचा कारभार मोठा असून अनेक अधिकारी उपस्थित असतात; मात्र आज पहिल्यांदाच बंदर निरीक्षक वर्दीत असल्याचे आपल्याला दिसले, असा टोला आमदार नाईक यांनी लगावला. बंदर विभागाला आवश्‍यक सहकार्य करण्यास आपण तयार आहोत; मात्र कोणताही हेतू ठेवून येथील व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा आहे. येथील किनारपट्टी भागात वॉटरस्पोर्टस्‌ तसेच अन्य पर्यटन व्यावसायिकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यावर परवानगी मिळावी, स्कूबा व्यवसायाबाबत धोरण निश्‍चित करावे, कारवाईत नियमितता असावी, पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी गृह व बंदरविकास मंत्री यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, असे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नियमानुसारच व्यवसाय करावा

""सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. गेल्या काही महिन्यात पर्यटन व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे कोणता तरी हेतू ठेवून बंदर अधिकाऱ्यांनी पर्यटन व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारू नये. सर्वांनी नियमानुसारच व्यवसाय करावा अशी आपलीही इच्छा आहे. त्यामुळे बंदर विभागाला जे सहकार्य अपेक्षित आहे ते आपण देऊ.'' 
- वैभव नाईक, आमदार 

व्यावसायिकांनी अधिकृतरित्या व्यवसाय करणे गरजेचे
""सध्या पर्यटन हंगाम असला तरी या काळात अनधिकृत व्यवसाय करणारे अचानक दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व पर्यटन व्यावसायिकांनी अधिकृतरित्या व्यवसाय करणे गरजेचे आहे. संबंधित व्यवसायिकांना परवानग्या मिळण्यासाठी जे सहकार्य बंदर कार्यालयाकडून अपेक्षित आहे ते आम्ही देऊ; मात्र अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू ठेवली जाणार आहे.'' 
- कॅप्टन सूरज नाईक, प्रादेशिक बंदर अधिकारी 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT