Action will be taken if there is no face mask 
कोकण

एका दिवसांत मंडणगडने वीस हजारांचा दंड असा केला वसूल...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना विषाणू संसंर्ग टाळण्यासाठी नागरीकांना सार्वजनीक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावण्याचे आरोग्य विभागाने निर्देश दिलेले आहेत. तसेच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मंडणगड शहरात याची कडक अमलबजावणी सुरू झाली असून एका दिवसांत २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात शिस्तीचे धडे नागरिकांना मिळू लागले असून नियम मोडणाऱ्यांना अंकुश लावला जातो आहे.
 सार्वजनीक ठिकाणी मास्कचा वापर टाळण्याचा नागरीकांचा कल दिसून येत असल्याने शासन स्तरावर मास्क न वापऱणाऱ्यांच्या विरोधात्मक दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मंडणगड नगरपंचायतीने शहर परिसरातील दंडात्मक कारवाईच्या नियमाची ता.३० एप्रिल रोजी अंमलबजावणी सुरु झाली आहे. काही नागरिकांना मास्क लावणे हे कमीपणा, शरम किंवा मला काय होतंय असा अविर्भाव असल्याचे निदर्शनात येत आहे.

मंडणगडात एका दिवसांत वीस हजारांचा दंड वसूल...

नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे. नगरंपचायतीने हाती घेतलेल्या या मोहीमेमुळे मास्क न लावता बाजारात फिरणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. काही वेळेला शाब्दिक मोठेपणा मिरवताना काही महाभाग आढळून येत आहेत. त्यांना समजावून ऐकत नसल्यास कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याचा पावित्रा घेतल्यानंतर गयावया करीत असल्याचे चित्र आहे. मास्क हा स्वतःचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी असल्याचा उपाय आहे. मात्र तोही टाळणाऱ्या नागरिकांना चांगला दणका नगरपंचायत प्रशासन देत आहे. 

नागरीकांना दंड करुन कायद्याची सक्ती करण्याचा प्रशासनाचा कोणताही हेतू नाही. स्वतःचे आरोग्य व रोगांचे संक्रमणापासून दर राहण्याकरिता नागरीकांनी स्वयंप्रेरणेने आरोग्य विभाग व शासनाचे निर्देशांचे पालन करावे.
- संतोष माळी, मुख्याधिकारी नगरपंचायत मंडणगड.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT