Adler Company  run in devrukha kokan marathi news
Adler Company run in devrukha kokan marathi news 
कोकण

लाॅकडाऊन असतानाही देवरूखातील ही कंपनी सुरूच ; कामगार असुरक्षितच...

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : साडवली (देवरुख) एमआयडीसीतील ॲडलर कंपनी लाॅकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही बिनबोभाट सुरू आहे. स्थानिक व्यवस्थापनाने अमेरिकेतील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते, परंतु अद्यापही कसला निर्णय झालेला नाही. आज सकाळी प्रशासनाने काही कामगारांना परत पाठवले मात्र त्यानंतर कंपनीने कामावर आलेल्यांना कंपनीत घेतले व कंपनी सुरू ठेवली आहे. यामुळे शेकडो कामगारांचे आरोग्य धोक्यात आहे. 

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी कामगार करीत आहेत. देवरूख एमआयडीसीमधील मेडिकल सर्जिकल इन्स्ट्रुमेंट तयार करणारी ॲडलर कंपनी सुरूच आहे. जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवार असल्याने त्या दिवशी कामगारांनी कामावर जाण्यास नकार दिला मात्र सोमवारी सुट्टी असतानाही तो दिवस कंपनीने भरून घेतला. त्यानंतरही कंपनी सुरू आहे. एका शिपला शंभर ते दीडशे कामगार एकाच वेळी कंपनीत जात आहेत.

कामगारांचे आरोग्य धोक्यात..  ​

जेवणाच्या वेळी व चेंजिंग रूममध्ये इतके कामगार एकाच वेळी असल्याने त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ॲडलर कंपनी ही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट तयार करणारी कंपनी असली तरी कंपनी प्रशासनाने  खबरदारी घेण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी कामगारांना कामावर येण्याची सक्ती करण्यापेक्षा सुरुवातीला काही ठरावीक कामगार, त्याचवेळी अन्य कामगारांना सुट्टी व पुढील दिवस सुट्टी असलेल्या कामगारांना नंतर कामावर बोलवून सुरुवातीला कामावर असणाऱ्यांना सुट्टी, अशा पद्धतीने योग्य ती खबरदारी कंपनीने घ्यायला हवी.

पुरुषाला बाहेर पाठवणार नाही  घेतली  भुमिका

लाॅकडाऊन जाहीर झाला असला तरीही कंपनीने कामगारांना याबाबत कसलीही सूचना दिलेली नाही. संचारबंदी असताना कामावर जायचे कसे, हा प्रश्न कामगारांचा समोर आहे, कारण पोलिसांचे पोकळ बांबूचे फटके कामगारांना खावे लागत आहेत. कंपनीने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे कामगारांचे म्हणणे आहे.कामगारांच्या कुटुंबियांनी कर्त्या पुरुषाला बाहेर पाठवणार नाही अशी भुमिका घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT