Ratnagiri : पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे; व्यावसायिकांत समाधान
Ratnagiri : पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे; व्यावसायिकांत समाधान sakal News
कोकण

Ratnagiri : पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे; व्यावसायिकांत समाधान

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाला गती मिळू लागली आहे. शनिवारी, रविवारी ‘वीकेंड’साठी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले वळत आहेत. परगावांतील पर्यटकांचा गणपतीपुळे, दापोलीतील किनाऱ्यांवर राबता वाढू लागल्याने व्यावसायिकांत समाधान आहे. मंदिरे सुरू झाल्यावर त्यात वाढ होईल, अशी आशा आहे.

गेल्या महिनाभरात बाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने शिथिलता देण्यास सुरुवात केली. शाळा, मंदिरेही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ चार भिंतीमध्ये राहिलेल्या नागरिकांनाही आता पर्यटनाचे वेध लागलेले आहेत. सुरक्षित आणि कोरोनामुक्त भागात फिरण्याकडे अनेकांचा कल आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही कमी असून, कोरोना बाधितांचा आकडाही नियंत्रणात आहे. सध्या वीकेंड पर्यटनालही चालना मिळत असून, काल (ता. २) गांधी व शास्त्री जयंती आणि जोडून रविवार त्यामुळे पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे फिरण्यासाठी धाव घेतली.

स्थानिकांसह जिल्हाबाहेरील पर्यटकही आता किनाऱ्यांवर मोकळ्या हवेत फिरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मालगुंडसह विविध किनारी भागांत पर्यटकांचा राबता दिसू लागला आहे. अजूनही या किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्टस्, पॅरासेलिंग आणि रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंग बंदच असल्याने पर्यटकांची निराशा झाली. घटस्थापनेला मंदिरे सुरू होत असल्याने हॉटेल, रिसॉर्टमध्ये आरक्षणासाठी चौकशीही सुरू झाली असून, पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

गणपतीपुळेत दर्शनासाठी नियोजन

मंदिरे सुरू होत असल्याने गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी तीन वेळा निश्‍चित केल्या आहेत. त्यात सकाळी सात ते दुपारी बारा, दुपारी एक ते सायंकाळी सात, त्यानंतर साडेसात ते साडेआठ या वेळेत भाविकांना दर्शन मिळेल. निर्जंतुकीकरण आणि साफसफाईसाठी काही काळ मंदिर बंद ठेवले जाणार आहे. गर्दी टाळणे, मास्क अत्यावश्यक यावर लक्ष ठेवले जाईल.

"पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटक गणपतीपुळेमध्ये येतात. निवास करणाऱ्यांचा टक्का कमी असला, तरीही मंदिर सुरू झाल्यावर त्यात वाढ होईल. सध्याची स्थिती आश्‍वासक आहे."

- उमेश भणसारी, व्यावसायिक, गणपतीपुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT