संगमेश्वर (रत्नागिरी) : सध्या कसबा, फणसवणे या परिसरात घोरपडी दिसण्याचे प्रमाण फार वाढले असून लहान लहान एक फूट लांबीची पिल्ले सर्रास कसबा, फणसवणे, कळंबस्ते परिसरात वावरताना दिवसाढवळ्या दिसत आहेत.
मुंबई-गोवा मार्गावरील धामणी मुकुंद कृपा हॉटेलजवळ व तुरळ येथील गणपती मंदिराजवळ, जवळपास अडीच फूट लांबीच्या दोन घोरपडी सायंकाळी तीन ते साडेचारच्या सुमारास महामार्गावर नेहमी दिसत असल्याचे चालकवर्गात बोलले जाते. चार दिवसांपूर्वी कसबा कुंभारवाडी पुलाजवळ रस्त्यावर एक अजस्र प्राणी रियाज अफसानी यांना दिसला. तेव्हा ते घाबरले. घोरपड जास्तीत जास्त किती मोठी असणार, दोन ते अडीच फूट लांबीची असेल असेच वाटत होते.
त्यामुळे घोरपडीच्या मदतीने सैनिक गडावर पोचतील, हे मनाला पटत नव्हते; मात्र चार दिवसांपूर्वी कसबा कुंभारवाडी पुलाजवळ रस्त्यावर एक अजस्र प्राणी रियाज अफसानी यांना दिसला. सुमारे चार फुटाहून अधिक लांबीचा होता. अफसानी हे दुचाकीवर असल्याने व समोरच तो प्राणी असल्याने क्षणभर काय करावे ते त्यांना कळेना.
एक रिक्षा आली व त्या रिक्षा चालकाने तो प्राणी म्हणजे घोरपड असल्याचे सांगताच अफसानी भानावर आले व हातातील मोबाईलवरून त्या अजस्र घोरपडीचे छायाचित्र घेतले. त्यानंतर ती घोरपड रस्त्याच्या पलीकडे जाऊन जंगलात दिसेनासी झाली. कसबा नायरी रोडवरील कसबा कुंभारवाडी पुलाजवळ दिसलेली ती घोरपड आता चर्चेचा विषय झाली आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.