वेंगुर्ले : ऐन दिवाळीत शिरोडा-केरवाडी अंधारात; ग्रामस्थ संतप्त sakal
कोकण

वेंगुर्ले : ऐन दिवाळीत शिरोडा-केरवाडी अंधारात; ग्रामस्थ संतप्त

शिरोडा एमएससीबीच्या कार्यलयावर धडक

दिपेश परब

वेंगुर्ले : तालुक्यातील शिरोडा-केरवाडी येथे दीपावली या ऐन सणाच्याच दिवशी एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे लाईट नसल्यामुळे ग्रामस्थांना दिवाळी पहाट अंधारात साजरी करावी लागली. याचा तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी एमएससीबी शिरोडा कार्यालयात धडक देत त्यांचा निषेध व्यक्त केला.

शिरोडा केरवाडी, बागायत, खाजनभाटी भागात गणपतीपासून लाईटचा खेळ खंडोबा सुरू आहे. काल (ता.३) तर दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना सायंकाळी अचानक लाईट गेल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला. थोड्या वेळाने लाईट येईल या आशेवर असणाऱ्या ग्रामस्थांना दिवाळी पहाट अंधारात साजरी करावी लागली. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

आज सकाळी ९ वाजता सरपंच मनोज उगवेकर यांच्यासह तातोबा चोपडेकर, पांडुरंग नाईक, आबा चीचकर, काशिनाथ नार्वेकर, आशिष पेडणेकर, श्री. मोटे, सोमकांत सावंत, गोपाळ बटा यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ एमएससीबी कार्यालया बाहेर गोळा झाले. यावेळी ग्रामस्थांनी या खात्याचा निषेध नोंदवत जोपर्यंत अधिकारी कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून होणार नाही, असा पवित्रा घेतला. 12 तास लाईट नसल्याने गावातील जे ग्रामस्थांचे, व्ययसायिकांचे नुकसान होते त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न सरपंच श्री. उगवेकर यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT