omicron sakal
कोकण

धोक्याची घंटा: लसीकरण हाच ओमिक्रिनवर उपाय ; उदय सामंत

जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री सामंत यांनी आज शासकीय बैठकांचा आढावा घेतला

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ लोक परदेशातून दाखल झाले आहेत. यातील ४५ जणांचा शोध लागला आहे. त्यातील २० जणांची तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित २० जणांचा अहवाल उद्यापर्यंत (ता.११) येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लसीकरण हाच ओमिक्रिनवर एकच उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री सामंत यांनी आज शासकीय बैठकांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भाकडवाड, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जिल्हा बाहेर पडत असतानाच आता सर्वत्र ओमीक्रोन व्हायरसने धोक्याची घंटा वाजवली आहे. याबाबत आज आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यात १ हजार ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. यातील ८३२ हे शासकीय असून उर्वरित बेड हे खासगी रुग्णालयातील आहेत. ७० व्हेंटिलेटर असून प्रत्येक रुग्णालयात २० टक्के बेड हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख २६ हजार ६०९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ५ लाख ५५ हजार १६८ नागरिकांनी पहिला तर ३ लाख ७१ हजार ४४१ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहे. नवीन ओमीक्रोन व्हायरस हा लसीकरण झालेल्यांना कमी प्रमाणत होत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात 'घर टू घर' जावून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

हायवेवरील अनधिकृत बांधकामे पाडणार

राष्ट्रीय महामार्गाचे काम जिल्ह्यात बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे; मात्र आता रस्त्याला लागूनच काही अनधिकृत बांधकामे उभी झाली आहेत. यावर बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, "हायवेवर जर अनधिकृत बांधकामे होत असतील तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकऱ्यांनी याबाबत पाहणी करावी आणि ज्या-ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे करत असतील त्यांना नोटीस काढावी तसेच अनधिकृत बांधकाम पूर्ण झाले असल्यास ते पाडण्यात यावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT