alibag historic Maha Shivaratri 2023 Religious and social activities
alibag historic Maha Shivaratri 2023 Religious and social activities  sakal
कोकण

Maha Shivaratri 2023 : हर हर शंभो... शिव महादेव...

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तालुक्यातील ऐतिहासिक आवास येथील नागेश्वर आणि कनकेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तांची पहाटेपासून गर्दी होती. मापगावातील डोंगरावर असलेल्या कनकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीनिमित्ताने तालुक्यात अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण होते.

अलिबाग तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त बैलगाडी शर्यतीची परंपरा या वर्षी खंडित झाली आहे. याची कसर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने भरून काढण्यात आली. गावोगावी शंकर मंदिर परिसरात यात्रा भरल्‍या होत्‍या.

काशी वीश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर कनकेश्वर मंदिराचा डोंगर चढताना ‘हर हर महादेव’चा गजर भाविक करीत होते. वेश्वीतील गोकुळेश्वर, गोरेगाव येथील त्र्यंबकेश्वर, पेणचे पाटणेश्वर, महलमिरा डोंगरावरील व्याघ्रेश्वर, महाड येथील श्री वीरेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. महाड येथील वीरेश्वर मंदिरात ओम नम:शिवाय, बम बम भोलेचा गजर सतत सुरू होता. मंदिराबाहेर पूजा साहित्‍याची दुकाने सजली होती.

भक्‍तिमय वातावरण

खोपोली (बातमीदार) : खोपोलीचे ग्रामदैवत व पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मध्यरात्री साडे बारा वाजता महापूजा व पहाटे पाच वाजता काकडआरती करून खोपोलीतील भगवान वीरेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त आजूबाजूच्या गावातील पालख्या वीरेश्वर मंदिरात दाखल झाल्या होत्या. खोपोलीत बाजारपेठेला लागून असलेले पुरातन भैरवनाथ मंदिर, भानवज-मोगलवाडी येथील भव्य बारा जोतिर्लिंग शंकर मंदिर, शिळफाटा येथील शंकर मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती.

पेशवेकालीन मंदिरात पालखी सोहळा

कर्जत (बातमीदार) ः तालुक्यातील तमनाथ येथे पेशवेकालीन शंकराचे मंदिर आहे. दरवषी महाशिवरात्रीला याठिकाणी यात्रा भरते. कोंदिवडे रस्त्यालगत असलेल्या उल्हास नदीपात्रालगत तमनाथ गावाच्या वेशीवरच पेशवेकालीन प्रसिद्ध असे शिवशंकराचे दगडामध्ये कोरलेले भव्य मंदिर आहे. सकाळच्या सत्रात अभिषेक, धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.

गुळसुंदेतील सिद्धेश्‍वर मंदिरात वारकऱ्यांची दिंडी

रसायनी (बातमीदार) : रसायनी-पाताळगंगात परिसरातील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दापिवली गावातील रसेश्वर मंदिरात देवस्थान विकास समितीच्या वतीने पहाटे चार ते सकाळी सहावाजेपर्यंत दुग्धाअभिषेक झाला. गुळसुंदेतील सिद्धेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, कराडे खुर्द येथील रामेश्वर मंदिर, घोसाळवाडी येथील खारेश्वर मंदिर तसेच वासांबे मोहोपाडा येथील शंकर मंदिरांत भाविकांनी गर्दी केली होती.

चांभार्ली येथील वारकऱ्यांनी गुळसुंदे येथे सिद्धेश्वर मंदिरापर्यंत दिंडी काढली होती. पेणमधील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरात विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी मनोभावे पूजा केली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याठिकाणी भजन स्पर्धाही ठेवण्यात आल्‍या.

पोलादपुरामध्ये शिवभक्तांचे श्रद्धास्थान

पोलादपूर (बातमीदार) : तालुक्‍यात निसर्गरम्य गिरी शिखरावरील ‘महादेवाचा डोंगर’ देवस्थान अखंड शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. शनिवारी सकाळी भाविकांनी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले. या वेळी महाआरती व विधिवत पूजा करण्यात आली. पोलादपूरातील शिवभक्तांनी महादेव डोंगर येथे पाऊलवाट साफसफाई, पाऊलवाटेच्या कडेने झाडांचे संगोपन, परिसराची स्वच्छता रंगरंगोटी व सुशोभीकरण केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT