all parties run grampanyat election independents in khed ratnagiri 
कोकण

निवडणुकीची रंगत आता वाढणार ; सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढवणार

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील ८७ ग्रामपंचायतीच्या ६८१ जागांसाठी दाखल झालेल्या ११८२ उमेदवारांपैकी ६६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ८७ पैकी २३ ग्रामपंचायतीतील ३३० उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ६४ ग्रामपंचायतीसाठी ६८५ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्ष जवळपास स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

८७ ग्रामपंचायतींसाठी ११९० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील ८ अर्ज अवैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. या वेळी ८७ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये दयाळ, शेल्डी, आष्टी, सात्वीणगाव, वावेतर्फे खेड, पोसरे बुद्रुक, साखर, चिरणी, जामगे, घेरापालगड, तुळशी खुर्द, बोरघर, मांडवे, मुंबके, शेरवली, तुंबाड, होडखाड, कर्टेल, कावळे, सवेणी, आंजणी, धामणंद, कर्जी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

कुळवंडी, कळंबणी खुर्द, ऐनवरे, घेरारसाळगड आंबवली, वरवली, बिजघर, कुंभाड, हुंबरी, नांदिवली, शिरगाव, गुणदे, शिवबुद्रुक, लवेल, दाभिळ, आवाशी, बोरज, लोटे, तळवटपाल, तळवट-खेड, कुरवळ जावळी, सापिली, चोरवणे, काडवली, आंबडस, धामणदेवी, सोनगाव, हेदली, मुरडे, आंबये, चाकाळे, शिवतर, चिंचघर, तिसे, साखरोली, पोयनार, सुकदर, धामणी, भिलारे आयनी, भरणे, वेरळ, शिरवली, उधळे बुद्रुक, कसबा नातू, खवटी, कशेडी, तळे, कुडोशी, मोहाने, जैतापूर, किंजळेतर्फे नातू, शिंगरी, कोरेगाव, मोरवंडे, पन्हाळजे, माणी, मिले, मेटे, कोतवली, कासई, केळणे, भडगाव आदी ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या ६४ ग्रामपंचायतींच्या १५७ प्रभागातून ६८५ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 

चिन्हांचेदेखील वाटप, बैठकांचा सपाटा

येथील तहसील कार्यालयाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना चिन्हांचेदेखील वाटप करण्यात आले. या निवडणुकीत सर्वच पक्ष जवळपास स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. ग्रामस्थांनी गावपातळीवर बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT