alphonso mango big leaf recorded in guinness world record and world wild book of record Sakal
कोकण

अद्भूत! ‘हापूस’चे विक्रमी आकाराचे पान; दोन जागतिक विक्रमांचा पानाला मिळाला मान

अद्भूत! ‘हापूस’चे विक्रमी आकाराचे पान,दोन विश्वविक्रम; कुडाळातील काजरेकरांच्या बागेतील वैशिष्ट

अजय सावंत

कुडाळ : येथील चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाची जगातील सर्वांत मोठे पान म्हणून नोंद झाली आहे. ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ व ‘वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’, अशा दोन जागतिक विक्रमांचा मान या पानाला मिळाला आहे.

यानिमित्ताने कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारत देश या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेंटीमीटर व रुंदी १५.६ सेंटीमीटर आहे.

निसर्गात बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात; पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झाले.

येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर त्यांनी शेकडो सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तळवडे (ता.सावंतवाडी) येथील शेतात बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, दुर्मिळ वनौषधीची लागवड आदी यशस्वी प्रयोग केले आहेत.

दरम्यान, या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी काजरेकरांनी आपल्या मुली डॉ. नालंदा व डॉ. नुपूर आणि जावई श्री. धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस, वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.

त्यानंतर पुर्नतपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.

वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र ठाकूर, प्राध्यापक उमेश कामत व प्राध्यापक दयानंद ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे,

छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपूर व जावई श्री. धीरज, डॉ. देवेन तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओची टीम यांचे सहकार्य लाभले.

लांबी, रुंदी मोजणी अन्...

आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना श्री. काजरेकर यांना हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या साहाय्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जागतिक रेकॉर्ड होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT