Ambet Bridge Closed after repairs structural audit mandangad
Ambet Bridge Closed after repairs structural audit mandangad sakal
कोकण

आंबेत पुलाची कथा भाग-३ दुरुस्तीनंतरही बंद केले; स्ट्रक्चरल ऑडिट कसले?

सचिन माळी.

मंडणगड : दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आंबेत पूल आठ महिन्यांत धोकादायक बनल्याने पुन्हा बंद करण्यात आला. यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट व एमएमबी सर्व्हेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या बाह्य अंगातील दुरुस्ती करण्यापूर्वी पाण्याखालील भागाची योग्य तपासणी का झाली नाही, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

दुरुस्ती निघालेल्या पुलासाठी ११ कोटींचा निधी मंजूर होऊनही काम सुरू होत नव्हते. मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये दुरुस्ती कामाला गती दिली. फेब्रुवारी २०२१ पासून जूनपर्यंत पूल बंद करून काम करण्यात आले. यात पूल लोड असणारे काम, आर्टिक्युलेशन, आतील काम, पिलर काम, अॅप्रोच वर्क, ब्रीज लिफ्टिंग, बेअरिंग फिक्सिंग, रोडवर्क असे पाण्याच्या वरील भागाचे काम आठ महिन्यांपूर्वी करण्यात आले. तसेच दोन्ही तीरांवर जंगल जेटीसाठी रॅम्प असा एकूण सुमारे १० कोटींच्या आसपास खर्च केल्याचे सांगण्यात येते. २७ जून २०२१ ला आदिती तटकरे यांच्या हस्ते पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

आता म्हाप्रळकडून आंबेतच्या दिशेने असणारा पाचवा पिलर धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रोबोद्वारा तांत्रिक पाहणी केली असता, हा पिलर थोडा कलला असून, पाण्याखाली पायाशी असलेल्या फाउंडेशनला भेगा पडून तो कमकुवत झाला आहे. तसेच पिलर परिसरातील वाळूचा दाब कमी झाला आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रचंड करंट असून, खडकात त्याचा परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येते. दुर्बिणीच्या सहाय्याने सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले असून, हा पिलर तीन ते चार एमएमने हलत असल्याचे निष्पन्न झाल्याची बाब पुढे आली.

प्रचंड खोली...

३०.४९७ मीटर उंची असणाऱ्या या पुलाखालील पाण्यातील भाग आता ६० फुटांपर्यंत असेल तर या ठिकाणी नेमके काय घडले आहे, याचा शोध आतापर्यंत संबंधित यंत्रणेने का घेतला नाही? पूल उभारताना ओहोटीच्या वेळी पायी खाडी पार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी आता प्रचंड खोली निर्माण झाली. याला कारणीभूत कोण? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

प्रत्येक वेळी दुरुस्तीसाठी दहा कोटी खर्च करूनही पुलाची अवस्था पुन्हा धोकादायक होत असेल तर काय म्हणावे? मंडणगड, दापोलीकरांची लोकभावना लक्षात घेऊन पुलाची योग्य रीतीने तत्काळ दुरुस्ती तसेच नवीन पुलाच्या निर्मितीलाही प्राधान्य देण्यात यावे.

- सखाराम करावडे, मंडणगडवासीय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT