in amboli truck crashed into a river And person missing  
कोकण

आंबोलीत ट्रक नदीत कोसळून एक बेपत्ता 

अनिल चव्हाण

आंबोली (सिंधुदुर्ग) - येथील हिरण्यकेशी फाटा येथे पुलाच्या कठड्याला धडकून ट्रक 15 फूट खाली असलेल्या नदीत कोसळला. यातील चालक बचावला; मात्र क्‍लिनर बेपत्ता आहे. उशिरा क्रेन आणून गाडी वर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. हा प्रकार शुक्रवारी रात्री 11 च्या दरम्यान घडला. 

संबंधित ट्रक (एमएच 09 सीए 2898) गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. त्यामुळे रेलिंग आणि 50 फूट लांबीचा पूर्ण कठडा यासह हा ट्रक सुमारे 15 फूट खाली नदीत कोसळला. नदीत 4 फूट पाणी आहे. त्यातील चालक सुशांत पाटणकर (रा. बेडकिहाळ, ता. चिक्कोडी) यांच्यासह तेथील क्‍लीनर सुधीर (पूर्ण नाव समजू शकले नाही.) हा गाडीत होता; मात्र यात चालक बचावला. क्‍लिनर मात्र बेपत्ता झाला. तो गाडीखाली सापडल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस जमादार आत्माराम तेली, गृहरक्षक महेंद्र परब, आंबोली बचाव पथकाचे मायकल डीसोझा, ज्ञानेश्वर राऊत पोहोचले. त्यांनी रात्री पाण्यात उतरून पाहणी केली; मात्र हाती काही लागले नाही. त्यानंतर सकाळी हवालदार दत्ता देसाई आणि जमादार तेली यांनी पुलात तसेच नदीच्या परिसरात पाहणी केली. मात्र, क्‍लिनरचा मागमूस लागला नाही. ट्रकमधील साहित्य रिकामे करण्यासाठी उशीर झाल्यामुळे ट्रक वर उचलण्यास सायंकाळी उशिरा सुरुवात झाली. उशिरापर्यंत क्‍लिनरचा पत्ता लागला नव्हता. यावेळी घटनास्थळी सहायक निरीक्षक बाबर यांनी भेट दिली. 

निकृष्ट कामाचा आरोप 
घाटात अनेकदा कठड्यांना ठोकल्यानंतर दंड वसुलीसाठी बांधकाम विभागाचे अधिकारी येतात. मात्र, आज गंभीर घटना घडून एकही अधिकारी फिरकला नाही. कठड्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे. उशिरा बांधकाम विभागाने तेथे तात्पुरते बॅरल आणि रिफ्लेक्‍टर लावले. 

बेपत्ताचे गूढ 
ट्रकचा चालक पोलिसांना विसंगत उत्तरे देत होता. दोन दिवसांपूर्वी माडखोल येथे याच ट्रकला किरकोळ अपघात झाला होता. उशिरापर्यंत गाडी बाजूला घेऊन क्‍लिनरचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत होते. संबंधित या अपघातानंतर बचावला असावा आणि रात्री तेथून निघून गेला असावा, अशी शक्‍यताही वर्तवली जात होती. यामुळे क्‍लिनर बेपत्ता प्रकरण गूढ वाढवणारे ठरले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT