Dr. Anil Kakodkar sakal
कोकण

Dr. Anil Kakodkar : संशोधन करण्यात अमेरिका, चायना देश पुढे, भारताचं स्थान नगण्य

विज्ञान, संशोधन कधीही थांबत नाही. विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली असून आर्थिक परिस्थिती वरही परिणाम झाला आहे.

प्रमोद हर्डीकर

साडवली - विज्ञान, संशोधन कधीही थांबत नाही. विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली असून आर्थिक परिस्थिती वरही परिणाम झाला आहे. परंतु आपल्या भारतात संशोधन करणाऱ्या खूप कमी संस्था आहेत. आपल्या भारतातील मुल परदेशात जाऊन संशोधन करतात. संशोधन करणाऱ्या कंपन्या या अर्थाजन करणाऱ्या उद्योगांमध्ये प्रमुख साधन आहे. संशोधन करण्यामध्ये अमेरिका आणि चायना हे देश पुढे आहेत.

यामध्ये भारताचे स्थान नगण्य आहे. भारताची प्रगती करायची असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.देश पुढारलेला व्हायला पाहिजे असेल तर तशी व्यवस्था सर्वदूर पसरली पाहिजे. आपल्या देशात जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे या भागात अशी व्यवस्था पसरणे अधिक गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्घ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे उभारलेल्या सृजन सायन्स अँड इन्होव्हेशन अँक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार शेखर निकम, डॉ. एन. जी. शहा, डॉ. अरुण सप्रे, उमेशकुमार रुस्तागी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, अनिरुद्घ खाडीलकर, गिरीश चितळे, अजय पिञे, डॉ. संजय जगताप, डॉ. माधव राजवाडे, वैजनाथ जागुष्टे, नितीन पंडित,मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,संस्थाध्यक्ष सदानंद भागवत व उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञान म्हणजे बरोबर उत्तर नव्हे तर विषयाचे सखोल माहिती असणे म्हणजे ज्ञान. या ज्ञानाची दालने अधिक विस्तृत करणे आवश्यक आहे असेही यावेळी श्री काकोडकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात रिसर्च सेंटर उभारणे ही अभिमानाची गोष्ट आहे.ग्रामीण भागातील मुलांना ही खूप मोठी संधी आहे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा नाहीत. त्यामुळे गुणवत्ता असूनही मुलांना चांगल्या सुविधांपासुन वंचित रहायला लागते.काही शाळांमध्ये तर विज्ञान शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या या सेंटर मुळे विद्यार्थ्यांना भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थीही उत्तम वैज्ञानिक होतील.या सेंटर मुळे मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.

या सेंटर मध्ये मुलांना स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते.या सेंटर मध्ये विज्ञान प्रेमी येऊ शकतात अशीही सुविधा आहे असे श्री रूस्तोगी यांनी सांगितले.मुलांमध्ये विज्ञानविषयक जागृती व्हावी, भविष्यात नवे संशोधक तयार व्हावेत, विज्ञान, गणित शिक्षकांना अधिक माहिती मिळेल या उद्गेशाने १४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित काम लवकरच करणार असल्याचे श्री भागवत यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा फाटक यांनी केले.तर आभार सचिव शिरीष फाटक यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT