Ancient architectural remains near Kunkeshwar temple konkan sindhudurg 
कोकण

कुणकेश्‍वर मंदिराजवळ प्राचीन वास्तू अवशेष 

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिराच्या समुद्राकडील भागात उतरण्यासाठी कायमस्वरूपी पायऱ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीच्या खोदकामात प्राचीन कुणकेश्‍वर मंदिराचे काळ्या बेसाल्ट दगडाचे कोरीव वास्तू अवशेष सापडत आहेत. मंदिराच्या मुख्य मंडपाच्या शिखरावर चालुक्‍य, शिलाहारांच्या काळात "करोटक' प्रकारातील कळसाचे बांधकाम केले जात असे. तशाप्रकारच्या बांधकामातील वास्तू घटक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहेत.

सापडलेले अवशेष संरक्षित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन येथील इतिहास संशोधन मंडळाने केले आहे. खोदकामात सापडलेल्या अवशेषाच्या अनुषंगाने या देवस्थान, तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जामसंडे येथे पत्रकारांना माहिती दिली. यावेळी रणजित हिर्लेकर, मधुसूदन फाटक, लक्ष्मण तारी, लक्ष्मण पाताडे, अजित टाककर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके, कुणकेश्‍वर सरपंच गोविंद घाडी, महेश ताम्हणकर उपस्थित होते. 

श्री. हिर्लेकर म्हणाले, ""श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिराच्या समुद्राकडील बाजूने खाली उतरण्यासाठी कायमस्वरूपी पायऱ्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी खोदकाम सुरू आहे. त्या दरम्यान प्राचीन कुणकेश्‍वर मंदिराचे काळ्या बेसाल्ट दगडाचे कोरीव वास्तू अवशेष सापडत आहेत. मराठा काळातील जीर्णोद्धारावेळी प्राचीन कुणकेश्‍वर मंदिराचे भग्नावशेष समुद्रालगतच्या भागात वाळूत ठेवले गेले असावेत. तेच अवशेष आता खोदकामावेळी दिसून येत आहेत. सापडणारे वास्तू घटक प्राचीन कुणकेश्‍वर मंदिराच्या मंडपावरील शिखर कशा पद्धतीचे होते. याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे आता बांधकाम सुरू असलेल्या कामात सापडणारे कोरीव वास्तू अवशेष बाहेर काढून संरक्षित करण्याची आवश्‍यकता आहे.'' 

संग्रहालय बनवल्यास पर्यटनास बळ 
खोदकामात सापडलेल्या पुरातन वास्तू अवशेषांचे संग्रहालय बनवता येऊ शकते. यातून स्थानिक पर्यटन वृद्धीला मोठा वाव आहे. तसेच इतिहास अभ्यासकांनाही याचा लाभ होऊ शकतो, असे रणजित हिर्लेकर यांनी सांगितले. 


खोदाईत काळ्या बेसाल्ट दगडाचे सुरेख कोरीव वास्तू अवशेष सापडले. आतापर्यंत विविध आकारांतील तीन कोरीव दगडाचे वास्तू अवशेष सापडले आहेत. ते सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
- रणजित हिर्लेकर, इतिहास संशोधन मंडळ, देवगड 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT