konkan esakal
कोकण

'अंगारकी'ला गणपतीपुळे समुद्रात जाण्यास भाविकांना प्रवेश बंदी

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून ही प्रवेश बंदी घातली आहे.

- राजेश शेळके

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून ही प्रवेश बंदी घातली आहे.

रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी उद्या (ता. 23) ला अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समुद्रात जाण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र शासनाकडील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सद्यस्थितीत कोविड - 19 मुळे महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शनानंतर किंवा दर्शना आधी येथे असलेल्या समुद्रामध्ये किंवा समुद्रकिनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात. अशावेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापुर्वी अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढून जिवितहानी होऊ नये म्हणून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार, नागरीकांच्या सुरक्षेसाठी हा आदेश जारी केला आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी उद्या (ता. 23) ला अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आज रात्री 12.01 वाजले पासून ते उद्या (ता. 23) रात्री 12.00 वाजेपर्यंत कोणत्याही भाविकास श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास या आदेशाव्दारे मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT