angnewadi yatra issue konkan sindhudurg 
कोकण

आंगणेवाडी यात्रा यंदा मर्यादित 

प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा 6 मार्चला होणार आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने सील केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात एकही दुकान अथवा विक्रेताही असणार नाही, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. 

दोन महिन्यांपूर्वी आंगणे कुटुंबीयांनी यावर्षीची श्री भराडी देवीच्या यात्रेची 6 मार्च ही तारीख जाहीर केली. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा केवळ आंगणे कुटुंबीयांच्या उपस्थितीत होऊन मंदिरातील धार्मिक विधी पार पडतील तसेच भाविकांना यात्रेत प्रवेश नसल्याचे आंगणे कुटुंबीयांनी स्पष्ट केले होते. 

प्रशासनानेही आंगणे कुटुंबीय सोडून अन्य भाविकांना यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले होते. दरम्यान राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीय मर्यादित होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेत आंगणे कुटुंबीय यांचीही एकाचवेळी गर्दी होऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन व आंगणे कुटुंबीय मंडळ यांची यात्रा नियोजनाची महत्वपूर्ण बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. 

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्‍यक त्या सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सभापती अजिंक्‍य पाताडे, पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, सरपंच सौ. पालव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता नितीन दाणे, अनंत आंगणे, दीपक आंगणे, काका आंगणे, बाबू आंगणे उपस्थित होते. 

जत्रेदिवशी पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनास येणाऱ्या आंगणे कुटुंबीय व्यक्तींची मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना विषयक आरोग्य तपासणी आरोग्य विभाग व आंगणेवाडी मंडळ यांच्यावतीने करण्यात येईल. तापमान व ऑक्‍सिजन तपासणी नंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. एकाचवेळी मंदिर व मंडप परिसरात 50 पेक्षा जास्त व्यक्त असणार नाहीत याची काळजी प्राधान्याने घ्यावी. अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मंदिर परिसरात आरोग्य पथक तैनात असेल, रुग्णवाहिकाही देण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी सांगितले. 

दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटुंबीयांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, आंगणे कुटुंबीय, आंगणे कुटुंबातील सुना, आंगणे कुटुंबातील लग्न झालेल्या मुली व त्यांचे कुटुंबीय यांनाच यात्रा कालावधीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, असे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले. 

मंदिराकडे येणाऱ्या मालवण, मसुरे व कणकवली मार्ग सील करण्यात येणार आहे. मंदिरापासून एक किलोमीटर पार्किंग व्यवस्था असेल. मंदिर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जत्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 मार्चला दुपारपर्यंतच पोलिस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी तैनात असतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

इतर काही सूचना 
यात्रेच्या निमित्ताने 5 मार्च ते 7 मार्च आंगणेवाडी येथून होणारी एसटी वाहतूक व इतर वाहतूक अन्य मार्गांद्वारे वळविण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सांगितले. मंदिर परिसरात एकही दुकान अथवा स्टॉल उभारता येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

नेते, पत्रकारांनाही प्रवेश नाही 
आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबीय मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेत मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.  

 संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT