Angry fishermen to ring the bell for ignoring demands 
कोकण

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त मच्छीमार करणार  "घंटानाद' 

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग) - आपल्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी पारंपरिक मच्छीमारांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या 14 व्या दिवशीही मत्स्य अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी उद्यापासून (ता. 25) "घंटानाद आंदोलन' छेडण्याचा इशारा दिला; मात्र सध्या जमावबंदी आदेश लागू असल्याने मच्छीमारांना हे आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

दरम्यान मच्छीमारांनी गेले चौदा दिवस आंदोलन सुरू असताना मत्स्यव्यवसाय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने संतप्त मच्छीमारांनी आज मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

एलईडी तसेच अनधिकृत पर्ससीनच्या मासेमारीवर कारवाई व्हावी यासह अन्य मागण्यांसंदर्भात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी उपोषणकर्त्यांची भेट घेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे. यात मत्स्यव्यवसाय विभागाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आलेल्या पत्रावर मच्छीमार समाधानी नसून त्यांनी जोपर्यंत शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे. 

गेले चौदा दिवस हे साखळी उपोषण शांततेत सुरू आहे. मात्र मत्स्यव्यवसाय खात्याने या उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट करत या विरोधात उद्यापासून घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. मात्र सध्या जमावबंदी असल्याने तुम्हाला हे आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

मच्छीमारांनी विणल्या जाळ्या 
पारंपरिक मच्छीमारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. गेले चौदा दिवस हे उपोषण सुरू आहे; मात्र अद्यापही मच्छीमारांना न्याय मिळालेला नाही. उपोषणामुळे व्यवसाय बंद असल्याने उपोषणाला बसलेल्या मच्छीमारांनी उपोषणस्थळीच मासेमारी जाळ्या विणण्याच्या कामास सुरवात केली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT