aniket provides food and water for caw in chiplun 
कोकण

लॉकडाऊनमध्ये या मुक्या जनावरांना आधार आता अनिकेतचाच.......

.मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) :  लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र उनार गुरांचा कोणीही वाली नाही. 
ही जबाबदारी शिरळ येथील अनिकेत बापट या तरूणाने घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात हा तरूण 10 उनार गुरांना चारा - पाणी पुरवत आहे. 


चिपळूण ते शिरळ मार्गावर गोवंश उनार फिरतात. या मार्गावरील हॉटेलचे मालक हॉटेलमधील शिल्लक पदार्थ त्यांना खायला द्यायचे. रस्त्यावर अनेक ठिकाणी भाजी विक्री व्हायची. सुकलेली आणि विक्री योग्य नसलेली भाजी विक्रेते रस्त्याच्याकडेला टाकून द्यायचे. ते खाऊन ही उनार गुरे आपला गुजरान करायची.

लॉकडाऊनमध्ये हा तरूण उनार गुरांना पुरवतोय चारा

मात्र लॉकडाऊनमुळे हॉटेल व इतर व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे उनार गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिरळ येथे बापट यांची कोकणगीड्ड प्रगती गोशाळा आहे. सात एकरच्या या गोशाळेत ते 17 गोवंश संभाळतात. लॉकडाऊनच्या काळात चिपळूण ते शिरळ प्रवास करताना त्यांना या मार्गावरील उनार गुरांचा प्रश्‍न लक्षात आला. त्यानंतर उनार फिरणार्‍या 10 गुरांच्या चार्‍याची जबाबदारी बापट यांनी घेतली. त्यांनी गोशाळेच्या परिसरात साडेतीन एकर क्षेत्रावर हिरव्या गवताची लागवड केली आहे. उनार गुरांच्या चार्‍यासाठी त्यांनी या गवताची कापणी सुरू करून हिरवा चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. 


चार्‍यासाठी वणवण भटकणार्‍या या गायी आणि त्यांच्या वासरांकडे बघून मन सुन्न होते. त्यामुळेच शक्य असलेले प्रयत्न करून मी त्यांच्या चार्‍याची व्यवस्था केली आहे. माझी सर्व प्राणीप्रेमींना विनंती आहे. तुमच्या घरासमोर एखादे गोवंश आले तर त्याला कधीही शिजवलेले अन्न, मैदायुक्त पदार्थ घालू नका. ते त्यांचे अन्न नाही.  प्रत्येकाची पचन प्रक्रिया वेगवेगळी असते. या पदार्थांचा त्यांना त्रासच होऊ शकतो. त्या ऐवजी गवत, पेंढा, शेंगदाणा पेंड असे  खाणे द्या.

अनिकेत बापट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

SCROLL FOR NEXT