Anil-Parab 
कोकण

पक्षामुळे अस्तित्व अन्यथा कोपऱ्यात बसण्याची वेळ

मी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन तुमच्यासमोर आलो आहे

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : येथील नगरपंचायतीच्या (Nagar panchayat Election 2021) केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पैसा देतो, निधी देतो, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका, असा हल्लाबोल पालकमंत्री अॅड. अनिल परब (Anil parab) यांनी नाव न घेता केला. सेनेचे नेते रामदास कदम (Ramdas kadam) व आमदार योगेश कदम (Yogesh Ramdas) यांचे नाव त्यांनी घेतले नाही; मात्र त्यांचा रोख कोठे होता, ते साऱ्यांच्या लक्षात आले. येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

आमच्यापाठी पक्ष आहे, म्हणून आम्ही या पदावर आहोत. अन्यथा, एका कोपऱ्यात बसण्याची वेळ आली असती, अशी जोरदार कोपरखळी परब यांनी मारली. आम्ही केवळ सत्तेसाठी नाही तर मंडणगड (Mandangad) शहराच्या व राज्याच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत, याचे भान सेनेच्या व राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावे. मी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackreay) यांचा निरोप घेऊन तुमच्यासमोर आलो आहे, असा निरोप त्यांनी शिवसैनिकांना दिला.

नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ अनिल परब, मंत्री उदय सामंत, (Uday Samant) खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्या हस्ते फोडला. परब म्हणाले, राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी म्हणून मंडणगड नगरपंचायत निवडणूक जोमाने लढवून जिंकायची आहे तसेच महाविकास आघाडीत (Mahaviakas aaghadi sarkar) कोणतीही कुरबूर व कुरघोड्या नाहीत. काही लोक पैशाच्या जीवावर अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. अशा बाजारू लोकांच्या अफवांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसेच जनतेनेही बळी पडू नये.

निधी कोणाच्या खिशातून येत नाही

परब पुढे म्हणाले, कोणाच्याही मनात शंका नको, म्हणून मी आलोय. आमचे पक्के ठरलेय, असे म्हणत शिवसेनेत आदेशाची अंमलबजावणी केली जाते व आदेश धुडकावणाऱ्याला त्याची योग्य जागा दाखविली जाते, असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या आघाडीमार्फत लढवण्याचा निर्णय हा अंतिम आदेश आहे. विकासासाठी येणारा कोट्यवधीचा निधी हा कोणाच्या वैयक्तीक खिशातून येत नसून तो महाविकास आघाडी सरकाराच्या तिजोरीतून येतो व त्याच्यावर येथील जनतेचाच हक्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT