anil parab sakal media
कोकण

किरीट सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही; अनिल परब

पालकमंत्री परब; मुरुडच्या रिसॉर्टचा मालक वेगळाच

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : मुरुड (Murud)येथील साई रिसॉर्टचा मी मालक नाही. याबाबत राज्य शासनाने व पोलिसांनी पूर्ण चौकशी केली आहे. हे रिसॉर्ट कोणाच्या नावावर आहे, कोणाच्या मालकीचे आहे, त्याचे सर्व कागदोपत्री पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. रिसॉर्टसाठी कोणी खर्च केला त्याचे पुरावे, आयकर विवरणपत्रही पोलिसांना दिले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आरोप करत आहेत की, हे रिसॉर्ट बेनामी आहे. याच्यामध्ये अवैध पैसा गुंतवला गेला आहे. या सर्व आरोपांचे उत्तर जी अॅथोरिटी मला प्रश्न विचारेल त्यांना मी देईन. सोमय्या यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. सोमय्या मला प्रश्न विचारू शकत नाहीत; परंतु त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी त्या त्या अॅथोरिटींना दिलेली आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषदेत केले.

ही जमीन मी खरेदी केली आहे. त्याचे रीतसर खरेदीखत केलेले आहे. ही जमीन मी विकली त्याचेही खरेदीखत करण्यात आले आहे. त्याचेही सर्व कागद महसूल यंत्रणेकडे दिले आहेत; मात्र जाणूनबुजून सरकारला बदनाम करण्यासाठी मंत्र्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. मंत्र्यांनी यामध्ये अवैध पैसा गुंतवलेला आहे, अशा प्रकारे आरोप करून आमची व सरकारची प्रतिमा खराब करण्याचे काम सोमय्या यांनी केले आहे. त्यांना मी कायदेशीर नोटीस दिलेली आहे. अब्रु नुकसानीचा दावा मी दाखल केलेला आहे. या दाव्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सोमय्या यांना माझी माफी मागावी लागेल किंवा मला १०० कोटी रुपये द्यावे लागतील, असे अनिल परब यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजय कदम उपस्थित होते.

पुढील निवडणुकीत नक्की

दापोली व मंडणगड (Dapoli,Mandangad)नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी (Shivsena-NCP)यांची आघाडी आहे. हा फॉर्म्युला रायगड जिल्ह्यातील नाही. याबाबत परब यांना विचारले असता, स्थानिक पातळीवर हा विचार पोचलेला नाही त्या ठिकाणी महाविकास आघाडी झालेली नाही. पुढील निवडणुकीत ती नक्की होईल, असे परब यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT