कोकण

पशुपक्ष्यांनाही अवकाळी पावसाचा फटका

CD

२० (टूडे २ साठी, अँकर)

पशुपक्ष्यांनाही अवकाळी पावसाचा फटका

वाऱ्यामुळे घरटी पडली ; आश्रयस्थान हरपले

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या अवकाळी पावसाचा फटका पशुपक्ष्यांनाही बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक पक्ष्यांची घरटी व अंडी पडली आहेत. शिवाय नवे घरटे बांधण्यातही बाधा येत असल्‍याचे नोंद पक्षी अभ्‍यासक महेश बापट यांनी केली आहे.
गेल्‍या आठवड्यात उष्‍मा काहीसा कमी झाल्‍यामुळे पशुपक्षी सुखावले होते. मात्र दोन-तीन दिवस पडलेल्‍या वादळी पावसामुळे पक्ष्यांची वाताहत झाली आहे. वेगवान वाऱ्यामुळे झाडांवरील घरटी कोसळली असून पक्ष्यांचे आश्रयस्थान हरपले आहे. त्यात दयाळ, क्षमा, तुरेवाली पाकोळी, मैना, तांबट, बुलबुल, ब्राह्मणी व साधी घार आदी पक्ष्यांच्या घरट्यांचा समावेश आहे. पाकोळी पक्ष्यांची अंडी हलकी असतात, वाऱ्यामुळे ती उडून गेली आहेत. घूबड किंवा इतर पक्षी जे झाडाच्या डोलीमध्ये घरटे करतात, त्यांची घरटी सुरक्षित राहिली. मात्र काही झाडे व झाडाच्या फांद्या पडल्यामुळे त्यांच्या घरटी बाधित झाली. त्‍यामुळे त्‍यांच्या प्रजनन व जीवन चक्रावरही परिणाम झाला आहे. बरेचसे पक्षी डिसेंबर व मे अशी साधारण दोन वेळा घरटी बांधतात. पावसाच्या आगमनापूर्वी पक्षी आपली घरटी बांधून पूर्ण करतात. त्‍यानुसार काही पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होती. मात्र अवकाळीने घरटी बाधित झाली. आता अनेक पक्ष्यांनी नव्या उमेदीने घरटे सावरण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे मुंग्या, वाळवी, बेडूक यांसारखे किटक सक्रिय झाले आहेत. हे सर्व प्राणी पक्ष्यांचे आवडीचे भक्ष असते. पावसामुळे अनेक ठिकाणी डबकी, नदी ओहोळ यांच्यात काही प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे पक्ष्यांसह इतर प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण थांबली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

SCROLL FOR NEXT