anjivade ghat issue konkan sindhudurg 
कोकण

आता आंजिवडे घाटासाठी लढा 

श्वेता पालकर

माणगाव (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील आंजिवडे-पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार घाट परिषदेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. 

माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर हा मेळावा झाला. यावेळी या नव्या मार्गासाठीचा लढा उभारण्याचे नियोजन झाले. यावेळी राजकीय वजन वापरण्या बरोबरच शासनाचे जलद लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आदी आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याचे ठरले. 
सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट मार्ग आता जीर्ण झालेले आहेत. या घाटातून सऱ्हास ठिकाणी दरडी कोसळत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्या घाटांची रूंदी वाढवणे सुद्धा कठीण आहे. 
गेली वीस वर्ष आंजिवडे-पाडगांव दरम्यानच्या भैरीची पाणंद घाट मार्गाची मागणी लोक सातत्याने करत आहेत. गत सरकारच्या काळात त्याचे सर्वेक्षणही झाले आहे.

वनखात्याने या मार्गात येणारी झाडेझुडपे साफ करून ही शिवकालीन पाणंद रिकामी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ एकच मोठे वळण दिसत असून केवळ तीन-चार ठिकाणी लहान मोऱ्या बांधायला लागतात. आंजिवडे गवळीवाडी ते पायथा असे 1 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीला 23 नंबरला नोंद आहे तेथे कच्चा रस्ता तयार झाला असून खड्डीकरणासाठी शासनाने 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे केवळ तीन किलोमीटरचाच घाट मार्ग करणे शिल्लक आहे. 
दरम्यान, यावेळी ऍड. किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, बाळ केसरकर, सगुन धुरी, दत्ता शिरसाट, प्रमोद धुरी, सचिन धुरी, आर. के. सावंत, जोसेफ डॉन्ट्‌स, श्रेया परब, प्रभाकर परब, प्रकाश मोरे, श्‍याम पावसकर, विजय पालकर, अजित परब, प्रमोद म्हाडगुत, शंकर कोराणे आदी उपस्थित होते. 

संघटीत लढा देण्याबाबत चर्चा 
या घाटाने कोल्हापूर सावंतवाडी अंतर 50 किलोमीटरने कमी पडत असल्याने येता जाता 100 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. या घाट मार्गाने वेळ व इंधन वाचणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने या मागणीला थोडी मरगळ आली होती; मात्र आता लोकांनी या कामी शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. तसे पक्षभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याबाबत चर्चा झाली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT