Annular solar eclipse seen sunday 
कोकण

या देशात सर्वप्रथम दिसणार सूर्यग्रहण तर भारतात सर्व प्रथम येथे दिसणार पहिल्यांदा ग्रहण...

सकाळ वृत्त सेवा

रत्नागिरी :  येत्या रविवारी (ता. 21 जुन)  रोजी एका अनोख्या खगोलीय घटनेची घटीका आहे. विज्ञानप्रेमींना अभ्यासाचा आणि सर्वांचा कुतुहलाचा विषय या निमित्ताने  दिसणार आहे.


 आसमंताच्या रंगमंचावर हे रंगणारं छाया-प्रकाश नाटय असं या ग्रहणाला म्हणता येईल. चालू शतकातील हे सर्वाधित काळ चालणारे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारातलं आहे. ऑस्ट्रोलिया, आफ्रीका, युरोपचा काही भाग यासह भारतातही काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. अर्थात मान्सूनने आभाळात ढंगाची दाटी असल्यास सर्व खगोलप्रेमींची निराशा होण्याचीही शक्यता दाट  आहे.

भारतात याठिकाणी दिसणार ग्रहण 
 कंकणाकृती ग्रहण म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यावर चंद्रामुळे सूर्याचा जवळपास सर्व भाग झाकला जातो आणि केवळ बांगडीच्या आकराची अर्थात कंकण आकाराची सूर्याची प्रभा कडेने डोकावताना दिसते. सुर्याला येणारी ही स्थिती खूप मोहक दृश्य निर्माण करणारी असते. हे ग्रहण आफ्रिकेतील कांगोमध्ये सर्वप्रथम दिसणार आहे. ज्याला स्पर्श बिंदू म्हणतात त्यानंतरचा याचा प्रवास इथिओपिआ, येमेन, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान मार्ग भारतात सर्व प्रथम राजस्थानात प्रवेश असा आहे. पुढे याचा प्रवास तिबेट, चीन हून प्रशांत महासागरात ते संपेल त्यापूर्वी ऑस्ट्रेलियातून देखील कंकणाकृती  सूर्यग्रहण बघता येईल.सूर्याची आभा झाकली गेल्याने भरदिवसा अंधार अर्थात रात्र झाल्याचा फिल देणारी  ही घटना आहे.


यांना मिळणार पहिल्यांदाच ग्रहण पहायला 

1994 नंतर ज्यांचा जन्म झाला अशा सर्वांसाठी हा पहिला ग्रहणानुभ असेल कारण यापूर्वी अशाप्रकारचं ग्रहण 24 ऑक्टोबर  1995 रोजी झाले  होते .ग्रहण काळात सूर्य किरण वक्री होतात त्यामुळे थेट डोळयांनी ग्रहण बघण डोळयांसाठी हानीकारक आहे. यासाठी ग्रहणचष्मा सर्वोत्तम उपाय आहे. काळया शिलच्या मदतीने टेलिस्कोप, ऑप्टीकल कॅमेरा किंवा अगदी साधी घरातील चाळणी, झाऱ्या यांच्या सहाय्याने याची प्रतिमा जमिनीवर किंवा कागदावर घेऊन  बघणं असे अनेक पर्याय सांगता येतील.  शतकातल्या या ग्रहणाच्या निमित्तानं आकाशात रंगणार हे नाटय सर्वांना एक पर्वणीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT