Architecture student Construction of bus stop wast management sakal
कोकण

टाकाऊ वस्तूंपासून बसथांब्यांची निर्मिती

आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची कमाल; परचुरी थांबा आकर्षण, टिकाऊसह देखणेही

- नागेश पाटील

चिपळूण : गुहागर तालुक्यातील परचुरी येथे आर्किटेक्चर विद्यार्थ्यांनी गावात एकाहून एक अशा अप्रतिम कलाकृती आणि वास्तू साकारल्या आहेत. टाकाऊ वस्तूंचा वापर करीत अवघ्या १० हजारांत नेत्रदीपक, देखणा बसथांबा उभारला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करत कमी खर्चात उत्तम कलाकृती साकारता येत असल्याचे दाखवून दिले आहे. प्रात्यक्षिक शिबिरासाठी पनवेल येथील अंजुमन-ए-इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पसच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी येथे आले होते. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विषयातील सर्व मुद्द्यांचा वापर करण्यात आल्याने आकर्षक बसथांबे, ही त्यांच्या शिबिराची देणगी आहे.

पनवेल येथील अंजुमन- इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी काही दिवसांपूर्वी गुहागर तालुक्यातील परचुरी येथे आले होते. या विद्यार्थ्यांमध्ये चिपळूण तालुक्यातील काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. शिबिरादरम्यान येथील ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी स्मरणात राहील, यासाठी काही काम करण्याचा मनोदय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यावर बसथांब्याची सूचना ग्रामस्थांमधून आली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी परचुरी येथे नेत्रदीपक असा बसथांबा उभारला आहे. यासाठीचा चिरा ग्रामस्थांनी दिला. उर्वरित सर्व बाबी विद्यार्थ्यांनी उपलब्ध केल्या.

बांधकामात नावीन्यता, गायीच्या शेणाचा वापर

रंगकाम करताना गायीच्या शेणात इतर रंग मिसळून आकर्षक, देखणे केलेले रंगकाम अधिक उठावदार दिसते. या बांधकामात बांधकामाच्या पायथ्यापासून छप्परापर्यंत मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असलेल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विषयातील सर्व मुद्द्यांचा वापर विद्यार्थ्यांनी स्वतः काम करून पूर्ण केले आहे. या प्रकल्पात कमी खर्चात विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून चांगल्या वास्तूंची निर्मिती करता येते, हे दाखवून दिले. यासोबतच बांधकामात नावीन्यताही विकसित केली आहे.

परचुरी येथील शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने बसथांब्यांचे बांधकाम केले. याशिवाय पऱ्याच्या ठिकाणी दगडांमध्ये कोरीव काम करून परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. बांधकामासाठी अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करून नेत्रदीपक काम केले आहे.

- प्रा. सिद्धेश कोळबंकेर, मार्गदर्शक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT