Ballaleshwar Ganpati Sakal
कोकण

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत माघी मासोत्सवास भक्तिमळा फुलला

अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव शुक्रवारी (ता.4) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

अमित गवळे

अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव शुक्रवारी (ता.4) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

पाली - अष्टविनायक (Ashtavinayak) देवस्थानांपैकी एक पालीतील (Pali) श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव (Ballaleshwar Maghi Mahotsav) व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव (Birth Anniversary) शुक्रवारी (ता. 4) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून विधान धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आला. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त माधव साने, उपेंद्र कानडे, सचिन साठे व राहुल मराठे आदींसह मंदिर पुजारी व गुरव, धंनजय गद्रे आदी मान्यवर व भक्त उपस्थित होते. जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात फक्त 50 भाविक उपस्थित होते.

माघी महोत्सवानिमित्त प्रशासन व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात रोषणाई, रांगोळी व सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी उत्सवात यावर्षी रस्त्यावर फक्त छोटी खेळण्यांची व इतर छोटी दुकाने लागली होती. तसेच काही विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले व मिठाईवाले होते.

यावर्षी श्री गणेशाची पालखी देखील कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघाली. तसेच पालखी रस्त्यात कोठेही थांबली नाही. लोकांना पालखीला न ओवाळता फक्त नमस्कार करण्यास सांगण्यात आले होते. भाविकांसाठी महाप्रसाद झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. वाहने राजीप शाळेच्या बाजूने भक्त निवास क्रमांक एक जवळून वळविण्यात आली होती.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने दिलेले सर्व प्रतिबंधात्मक उपाय करून व खबरदारी घेत मंदिर प्रशासनाने व्यवस्थापन केले आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना भाविकांना दिल्या जात आहेत. मंदिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग वेगळे केले आहेत. सॅनेटाइझरची, मोफत पार्किंगची व्यवस्था केली आहे. भक्तनिवास खुले आहेत. तसेच जागोजागी सुरक्षारक्षक नेमले आहेत. भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत.

- ऍड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट

व्यावसायिकांचे दुःख

कोरोनामुळे दोन वर्षांपासून यात्रा व उत्सव यावर बंधने आली आहेत. लोकांचे येण्याचे व खरेदी करण्याचे प्रमाण देखील कमी आहे. परिणामी मालाला उठाव नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे उत्सवात पुस्तक विक्रेते महिला माधवी मुंढे यांनी सांगितले. तर खेळणी विक्रेते मोहन काळे म्हणाले की यंदा निर्बंध कमी होतील असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय देखील झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT