attack from family member topic of land disputes in sindhudurg 
कोकण

जमिनीच्या वादातून केला प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जमिनीच्या वादातून जांभवडेतील आकाराम रामकृष्ण पवार (वय ६४) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार काल रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला.

या प्रकरणी पोलीसांनी मानाजी रघुनाथ पवार, धनाजी रघुनाथ पवार, सुर्याजी परशुराम पवार, प्रकाश मानाजी पवार, शिवाजी रघुनाथ पवार यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केलेला आहे. जांभवडेतील आकाराम पवार आणि मारहाणकर्ते यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. 
आकाराम पवार यांनी यासंदर्भात न्यायालयात दावा केलेला आहे. त्याची सुनावणी बुधवारी होती. पवार यांचे कुटुंबिय मुंबईला असल्याने ते जेवणासाठी कोळंब येथील नातेवाईकांकडे गेले होते. रात्री उशिरा जेवण आटोपुन पवार आणि त्यांचा भाचा वैभव आरडे घरी परतत असताना त्यांच्यावर या सहाही जणांनी लोखंडी सळी, दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. 

सहा जणांनी अचानक हल्ला केल्यामुळे पवार त्यांना प्रतिकार करू शकले नाहीत. त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय अन्य ठिकाणी सुध्दा मार बसला आहे. त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचाराकरीता कणकवलीला हलविण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्यानुसार त्यांना कणकवलीला नेण्यात आले.
या प्रकरणी पोलीसांनी सहाही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026

अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

झोपेची पद्धत आणि कणा

ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!

SCROLL FOR NEXT