attack from knife from two persons to stop the disputes in sindhudurg 
कोकण

दोघांचे भांडण सोडवायला गेलो आणि आम्हीच गंभीर जखमी झालो

भुषण ओरासकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दुचाकी पार्क करण्याच्या वादावरून दोघांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यात दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सावंतवाडी येथील मच्छीमार्केट परिसरात रविवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. चेतन पुरुषोत्तम देऊलकर आणि संतोष वागळे अशी जखमींची नावे आहेत. तर या प्रकरणात संबंधित दोघांवर चाकुहल्ला करणारे महेश कृष्णा दाभोलकर ( वय ४९), कुशल महेश दाभोलकर (वय २३) जुनाबाजार, सावंतवाडी या दोघांनाही अटक करण्यात आली. 

घडलेली घटना अशी, रविवारी रात्री साडे अकरा वाजता मच्छीमार्केट परिसरात दुचाकी पार्क करण्याच्या वादावरून दोघांमध्ये भांडण लागले. वाद सोडवायला गेलेल्या दोघांवर चाकूने हल्ला केला गेला. हा हल्ला झाल्याचा प्रकार लक्षात येताच तेथील काही स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी संबंधित संशयितांना हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना कापडणे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेशी संबधित पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shetkari Karj Mafi : ३० जूनची मुदत उलटली; शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब, नवीन डेडलाईन काय?

Latest Marathi News Live Update : 'बीएलओ' आजपासून आपल्या दारी; रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख मतदारांची पडताळणी

Patan Rain : कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे पुनरागमन; ९.२१ टीएमसी पाणीसाठा

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

SCROLL FOR NEXT