किल्ल्याने केले आकृष्ट; नजारे दिसले उत्कृष्ट  sakal
कोकण

पावस : किल्ल्याने केले आकृष्ट; नजारे दिसले उत्कृष्ट

पूर्णगडकडे वळली पर्यटकांची पाऊले; सायंकाळी पाच वाजता दरवाजा बंद; गावखडी किनाऱ्यावरही फेरफटका

सकाळ वृत्तसेवा

पावस : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत चालल्याने अनेक पर्यटक भटकंती करण्यासाठी बाहेर पडू लागल्याने सध्या नव्याने साज चढवलेल्या रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड किल्ला परिसराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. येथील किल्ला पर्यटकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.

सागरी मार्गाजवळ असलेला पूर्णगड किल्ला टेहळणीसाठी बांधण्यात आला होता. हा भाग गेली अनेक वर्ष झाडाझुडपांनी वेढलेला असल्यामुळे पर्यटकांपासून दूर होता. किल्ला दुरुस्त करून पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी पर्यटकांमधून होत होती. तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. पुरातत्त्व विभागामार्फत या किल्ल्याची दुरुस्ती करून पर्यटकांच्या स्वागताला सुसज्ज करण्यात आला होता. परंतु गेली दीड वर्षे लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणी निर्बंध होते. आता जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती निवळत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे.

या किल्ल्याचा दरवाजा सकाळी नऊ वाजता उघडल्यानंतर सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात येतो. या किल्ल्याच्या तटबंदीवरुन पूर्णगड-गावखडी खाडी पूल, गावखडी सुरुबन तसेच खाडी व समुद्राचा आनंद लुटता येतो. किल्ला पाहण्यासाठी अनेक लोक येतात. किल्ल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रवेशद्वारावरच येणाऱ्या पर्यटकांचे नोंदणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांवर बंधने येत असली तरी त्यामुळे नियमांचे पालन केले जाते.

सावधगिरीसाठी सायंकाळी किल्ला बंद

पूर्णगड किल्ल्यावर सायंकाळी अनेक पर्यटक येतात. त्यात प्रामुख्याने प्रेमयुगुले जास्त असतात. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाच वाजता गडाचा दरवाजा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. गडाचा दरवाजा बंद झाल्यानंतर पर्यटक गावखडी समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

पूर्णगडचे दरवाजेही उघडले

शासनाने पर्यटनाला गती देण्याच्यादृष्टीने अनेक किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे खुली केली आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिक बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. येथील पूर्णगड किल्ल्याचे दरवाजेही उघडले आहेत. सुशोभीकरणामुळे नवा साज मिळालेल्या या किल्ल्यावर पर्यटकांची पावले पडू लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT