Atul Ravrane Comment Why He Come To Sindhudurg  
कोकण

अतुल रावराणे म्हणाले, यासाठीच आलो सिंधुदुर्गात 

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून अहोरात्र झगडणाऱ्या डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यासाठी बदलापुरहून जिल्ह्यात आलो. माझ्या जिल्हावासियांशी असलेल्या सामाजिक बांधीलकीतून आलो. त्यामुळे कुणी माझ्यावर टिका करीत असेल तर मला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केली आहे. 

श्री. रावराणे यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, जिल्हावासियांशी माझे ऋनाणुबंध आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाशी प्रामाणिकपणे काम करीत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या हेतुने आपण 21 एप्रिलला एक हजार पीपीई किट घेवून बदलापुरहून जिल्ह्यात आलो. हे किट शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आपण आमदार वैभव नाईक यांच्याकडे स्वाधीन केले आणि मी आणि माझा सहकारी होम क्‍वारंटाईन झालो; परंतु काही लोक राजकीय हेतूने प्रेरित आरोप करीत आहेत. 

सध्याची स्थिती ही राजकारण करण्यासारखी नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. जेणेकरून कोरोनाबरोबरची लढाई आपण लवकरात लवकर जिंकु शकतो; परंतु त्यांच्याशी देणघेण नसलेले लोक टिका करण्यात स्वारस्य दाखवित आहेत; मात्र कुणीही माझ्यावर टिका केली तरी आपण जिल्ह्यात सामाजिक काम करीतच राहणार.'' 27 एप्रिलला मी व माझ्या सहकाऱ्यांने टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला असल्याचे स्पष्टीकरण श्री. रावराणे यांनी केले आहे. 

जिल्हा कोरोनामुक्तीकडे जात असल्याचे दिसताच जिल्ह्याचे स्वत:ला कैवारी समजत असलेले काही लोक जिल्ह्यात आले. त्यांनी नेहमीप्रमाणे स्टंट केले; परंतु तत्पुर्वी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि त्यांना साथ देणारे पालकमंत्री, आमदार नाईक यांनी जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय योग्य पध्दतीने हाताळली. आपण केवळ पीपीई किट देण्यासाठी आलो. त्याचा इतका पोटशुळ काही लोकांना का यावा? असा प्रश्‍न माझ्यासमोर आहे. 
- अतुल रावराणे 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP: योगी सरकारकडून १७ कंपन्यांना हिरवा कंदील; २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार नोकऱ्यांचा धमाका!

Pune News: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाने कोठडीत जीवन संपवले; वडगाव निंबाळकर येथील प्रकार, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Latest Marathi News Live Update: खडक पोलिसांची फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई

Latur News: ‘अमृत’ पाणी योजनेला घरघर; महापालिका भरेना हिस्सा, २५९ कोटींच्या योजनेला खो

Mumbai : कृष्णाने रविवारी रात्री बर्थडे साजरा केला, सोमवारी पहाटे मुस्कानसोबत मरीन ड्राइव्हवर गेला; अपघातात तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT