automatic hand sanitizer dispenser machine made by professor of electronics and two students studying engineering ratnagiri 
कोकण

कौतुकच ; आता बाजारात येणार ‘ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ कसे वाचा....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. परंतु सॅनिटायझरची बाटली वारंवार हाताळण्याऐवजी सेन्सरद्वारे फक्त दीड मिली सॅनिटायझर मिळण्याकरिता इलेक्ट्रॉनिक्सच्या प्राध्यापिका व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी ‘ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ची निर्मिती केली आहे. आगामी काळात हे मशिन बाजारात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ला अनुसरून त्यांची ही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

विद्यार्थी, प्राध्यापिकेने बनवले सॅनिटायझर मशिन


येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्राध्यापिका असलेल्या सीमा फळणीकर व सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे अमेय चवेकर, भूषण वायंगणकर या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. प्रा. फळणीकर यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. आपल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवण्याकडे त्यांचा कल असतो व त्यामुळेच पुढील शिक्षण घेणारे अनेक माजी विद्यार्थी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. अशाच प्रकारे अमेय व भूषण यांनी हे मशिन बनवले आहे.

असे बनवले मशिन

बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल, दीर्घ काळ टिकणारी बॅटरी, पॉवरसूट, तीन महिन्यांची वॉरंटी, केपेबल सेन्सर्स, प्रोग्राम्ड फीचर्स ही याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. लवकरच हे मशिन बाजारात आणण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. शाळा, महाविद्यालये, दुकानात लवकरच हे मशिन उपलब्ध होईल. सर्वजण संकटाशी जास्त सक्षमतेने दोन हात करू शकू, असा विश्‍वास सीमा फळणीकर यांनी व्यक्त केला.सुरवातीला सर्किट शोधून सुधारणा करत गेलो. एसी ऑपरेटेड, अ‍ॅडाप्टर वापरून मशिन केली होती. त्यावर भरपूर प्रयोग केले, वापरून बघितले. पण लाँग लाईफ बॅटरी ऑपरेटेड बनवायचे होते. त्याकरिता चांगला पॉवर बॅकअप घेतला. गरजेनुसार एकेक बदल करत गेलो. कॅबिनेट प्लास्टिक, पाईपची असून अधिक चांगली करायची आहे.

पर्याय म्हणून ही कल्पना
“सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करत आहोत. त्यामध्ये सॅनिटायझर हे महत्त्वाचे साधन आहे. पण अनेक वेळा हाताळली जाणारी सॅनिटायझरची बाटली आणि दुकाने, बँका, कार्यालयात कामासाठी दिवसभर व्यस्त असणारा माणूस यावर पर्याय म्हणून ही कल्पना सुचली व मशिनची निर्मिती केली.”
- प्रा. सीमा फळणीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT