Awareness About Corona In Mandangad Through Paintings  
कोकण

कोरोनाच्या जागृतीसाठी मंडणगडात असाही उपक्रम

सचिन माळी

मंडणगड ( रत्नागिरी ) - आपण खरंच कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्‍यात आणत आहात, असा सल्ला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना मंडणगड शहरातील चौकात रेखाटलेल्या चित्रांतून दिला आहे. घरात राहू या, कोरोना टाळू या असा संदेश देत जनजागृती केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी विविध उपक्रम राबवित नागरिकांना जागृत केले. मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या कल्पनेतून अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. शहरातील स्वच्छतेवर भर देताना सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, बस स्थानक, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले.

शहरात अत्यावश्‍यक सुविधा व्यवस्थित चालू राहण्यासाठी नियोजन केले. मंडणगड नगरपंचायतीच्या वतीने अनोखा उपक्रम राबवित नागरिकांना आवश्‍यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात सोशल डिस्टन्स राहण्यासाठी भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानासमोर होणारी गर्दी लक्षात घेत सुरक्षित अंतरावर चौकोन आखून अंतर ठेवले आहे.

घरपोच सेवा दिल्याने बाजारात होणारी गर्दी आपोआप कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातून येणारे नागरिकही त्याचा अवलंब करीत आहेत. शहर परिसरात पंचायत समिती, मुख्य चौक, बस स्थानक परिसरात हात धुण्यासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली. त्या ठिकाणी साबण, सॅनिटायजर उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच नागरिकांना मास्कचे वाटप केले. नगरपंचायतीला विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्याधिकारी यांच्या विविध उपाययोजनांचे नागरिकांनी स्वागत केले असून कौतुक केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT