Kokan Sakal
कोकण

बॅ. सावरकरांनी केली बलोपासनेची पायाभरणी

चार हजार रुपये खर्चून जागा घेऊन त्यावर पक्के बलोपासना मंदिर उभारण्याचे ठरवले.

- मकरंद पटवर्धन

हिंदू समाजातील तरुणाईने एकत्रितपणे बलोपासना केली पाहिजे यासाठी सावरकरांनी प्रथमपासूनच प्रयत्न सुरू केले होते. नगर संस्थेने डॉ. शिंदे यांच्या प्रस्तावाप्रमाणे ठराव करून शहर व्यायामशाळेचे कार्य सुरूही केले होते. पहिल्या तीन वर्षांत ही व्यायामशाळा चालवण्याचा व टिकवण्याचा भार सावरकरांच्या हिंदू मंडळास वाहावा लागला. सावरकरांची प्रेरणा, प्रयत्न आणि डॉ. शिंदे, रा. सा. रानडे, जनुभाऊ लिमये, श्री. खातू प्रभृती म्युनिसिपल सभासदांनी जी मेहनत घेतली त्याचे चीज १९२९ साली झाले आणि रत्नागिरी नगरपालिकेने चार हजार रुपये खर्चून जागा घेऊन त्यावर पक्के बलोपासना मंदिर उभारण्याचे ठरवले.

म्युनिसिपल सभासद रघुनाथराव कदम यांच्या पुढाकाराने १९२९ च्या विजयदशमीनिमित्त व्यायामशाळेची कोनशिला बॅरिस्टर सावरकर यांनी ठेवली. मराठी व इंग्रजी शाळांनी त्यांची मुले वर्गाचे शिक्षक बरोबर देऊन व्यायाम करण्यासाठी या व्यायाम मंदिरात नियमाने धाडावीत, व्यायाम हा अभ्यास अंतर्गत विषय ठेवावा, अशी विनंती बॅरिस्टर सावरकरांनी सर्वच शाळाचालकांना भेटून केली. या व्यवस्थेप्रमाणे बहुतेक शाळांतील मुले एक नियम म्हणून व्यायामास येऊ लागल्यामुळे व्यायामशाळेत विद्यार्थ्यांचा तुटवडा पडणे बंद झाले.

येथे पट्टा, तलवार यांचे स्व- संरक्षण विषयात प्रवीण झालेल्यांचे वर्गही कृष्णाजी शिंदे, वासुदेव हर्डीकर, पवार प्रभृती तरूणांनी तीन ठिकाणी चालविले. किल्ला भागातील मुलांसाठी तिकडेही वर्ग चालविण्यात आला. बाहेरच्या नामांकित मल्लांना बोलावून मे महिन्यांत कुस्त्यांची मोठी दंगल रावसाहेब रानडे यांचे अध्यक्षतेखालील समारंभात करविली. रत्नागिरीकरांचा कुस्त्यांची दंगल पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

सर्व प्रयत्नांमुळे व व्यायामशाळेच्या उभारणीमुळे रत्नागिरी येथील बर्‍याच युवकांना लहानपणातच व्यायामाची व शरीरसंवर्धनाची आवड निर्माण झाली. गाडीतळाजवळच्या भागात विस्तीर्ण मोकळी जागा होती. बॅरिस्टर सावरकरांनी या पटांगणाचे स्वातंत्र्यलक्ष्मी चौक असे स्फूर्तीदायी नामकरण केले. आजही याच नावाने हे पटांगण प्रसिद्ध आहे.

काही वर्षांनी विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी नगरपालिकेच्या वतीने या पटांगणात शहर, जिल्ह्यातील व्यायामपटूंची व्यायामाची व धाडसी उपक्रमांची प्रात्यक्षिके सादर करून दसरा उत्सव साजरा होऊ लागला. या निमित्ताने मुले, युवकांना एकत्र येऊन व्यायामास प्रेरित करणार्‍या अशा उपक्रमांमुळे जातीभेदाच्या विषाणूचे निर्मूलन होण्याचे सावरकरांचे कार्यासही गती मिळाली.

विजयादशमीचा हा वार्षिक समारंभ हे रत्नागिरीचे एक भूषण व आकर्षण होते. या उत्सवासाठी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात तरतूद असे. १९७५-८० च्या सुमारास अनाकलनीय कारणांकरिता या समारंभाच्या परंपरेमध्ये खंड पडला. अलीकडेच या व्यायामशाळेच्या मूळ इमारतीचे जागी नवीन इमारत नगरपालिकेततर्फे बांधण्यात आली आहे. यामध्ये मुलांप्रमाणे मुलीनाही स्वतंत्रपणे व्यायाम शिकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याखेरीज पालिकेची आणखी व्यायामशाळा, खासगी व्यक्तींच्या व्यायाम शिक्षणशाळाही रत्नागिरीत सुरू झाल्या आहेत. हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी १९२५ पासून घेतलेल्या कष्टांचे फळ आहे. पण या सर्वात खंत एकच आहे, ती म्हणजे नगरपालिकेच्या विजयादशमीच्या सोहळ्याच्या आयोजनाचा अभाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT