दापोली - दापोली-काळकाई कोंड येथील वास्तव्यास असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. 
कोकण

दापोलीशी बाबासाहेबांचे भावनिक नाते

सकाळवृत्तसेवा

दापोली - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्‍यातील आंबडवे असले, तरी दापोली शहराशी त्यांचे भावनिक नाते होते. आजही दापोलीकरांचे त्यांच्याशी आदराचे नाते आहे. त्यांचे शहरातील वास्तव्य दापोलीकरांसाठी अभिमानाचा बिंदू आहे. काळकाई कोंड येथे त्यांचे बालपण गेले.

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्य प्रदेश राज्यातील महू येथे झाला. वडील सुभेदार रामजी सकपाळ महू येथे लष्करी सेवेत कार्यरत होते. १८९३ ला लष्करातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबासह दापोली येथे वास्तव्यास आले. या कुटुंबाचे १८९६ पर्यंत काळकाई कोंड येथील कौलारू घरात वास्तव्य होते. याठिकाणी सध्या त्रैलोक्‍य बौद्ध महासंघाचे वसतिगृह आणि ध्यान केंद्र आहे. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही. यामुळे घरीच भीमरावास अक्षरओळख करावी लागली. १८९६ ला सुभेदार रामजी आपल्या परिवारासह दापोली येथून सातारा येथे राहण्यास गेले. या वेळी भीमराव पाच वर्षांचे झाले होते.

डॉ. बाबासाहेब यांचा यानंतर दापोलीशी पुन्हा संबंध १९०७ ला त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने आला. दापोलीपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या वणंद येथील भिकू आणि रुक्‍मिणी धोत्रे यांची कन्या रमा हिच्याशी भीमरावचा विवाह झाला. आई-वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर रमाई आणि त्यांच्या भावंडांना त्यांचे मामा मुंबईत घेऊन आले. रमाई आणि त्यांची दोन भावंडे भायखळा येथे मामांकडे वास्तव्यास होती. वयाच्या नवव्या वर्षी रमाबाईचे लग्न बाबासाहेबांशी मुंबईत झाले. रमाईंचे माहेर जरी वणंद हे गाव असले तरी लग्नानंतर डॉ. बाबासाहेब आणि रमाईनी वणंदला भेट दिल्याची नोंद आढळत नाही; मात्र त्यांचे येथील वास्तव्य दापोलीकरांना अभिमानाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Kardile : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन, ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार?

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT