bad road in talere deulwadi sindhudurg 
कोकण

तळेरे देऊलकरवाडीत रस्ता दयनीय 

नेत्रा पावसकर

तळेरे (सिंधुदुर्ग) - येथील आनंदनगरमार्गे आयरेवाडी- देऊलकरवाडीत जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कासार्डेतील एकमेव सुरक्षित असलेला रस्ताही आता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. 

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे साधारण सहा किलोमीटरचा हा रस्ता तयार केला असून प्रत्येकवर्षी हा रस्ता दयनीय होतो. संबंधित ठेकेदाराकडून प्रतिवर्ष थोड्या प्रमाणात मलमपट्टी केली जाते. पुन्हा प्रतिवर्षी येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे यावर्षीही अनेक ठिकाणी या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य वाढले आहे.

पुलावरही मोठ्या प्रमाणात गवत रूजले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहते त्यामुळे खड्यांमध्ये वाढच होत आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत असूनही अनेक ठिकाणी गटाराचा पत्ता नाही. तरीही शासनाकडून संबंधित ठेकेदाराला बिल कसे अदा केले? असा प्रश्‍न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून देखभालीचे हे अंतिम वर्ष असून निदान या वर्षीतरी हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी विशेष करून सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालावे, अशी मागणी कासार्डे ग्रामस्थांकडून केली जात आहे.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

SCROLL FOR NEXT