Banda police take acation on illegal liquor traffic 
कोकण

गोव्याहून गुजरातच्या दिशेने चालू होती दारू वाहतुक ; पोलिसांनी केली तपासणी तर...

सकाळवृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकी विरोधात आज मोठी कारवाई केली. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्याहून गुजरातच्या दिशेने कँटर मधून होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई करत २० लाख ३४ हजारच्या दारुसह तब्बल ३२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गाडी तपासणीसाठी थांबविताच काळोखाचा फायदा घेत चालक व क्लिनर फरारी झालेत. ही कारवाई मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

गोव्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कँटर (जीजे ०६, एझेड ५५३५) मध्ये लोखंडी अँगल भरण्यात आले होते. गाडीत मिळालेल्या पावत्यांमध्ये वडोदरा-गुजरात येथील एका कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती. तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी राजेंद्र शेळके यांना संशय आल्याने त्यांनी गाडी तपासणी करण्यासाठी थांबविली. गाडीच्या पाठीमागील हौद्यात लोखंडी अँगलच्या खाली गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पोलिसांनी २० लाख ३४ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे २५९ खोके व १२ लाख रुपये किमतीचा कँटर जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अलीकडच्या काळातील ही बेकायदा दारू वाहतुकी विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT