Mahavitaran esakal
कोकण

Mahavitaran : महावितरणची दर्जेदार सेवा मिळणार कधी? वीज ग्राहकांचा सवाल

अनेक गावात अद्यापही विद्युत वाहिन्या, खांब धोकादायक स्थितीत आहेत. रात्री-अपरात्री तसेच दिवसाढवळ्या कधीही दुरुस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

बांदा - जिल्ह्यातील अनेक गावात अद्यापही विद्युत वाहिन्या, खांब धोकादायक स्थितीत आहेत. रात्री-अपरात्री तसेच दिवसाढवळ्या कधीही दुरुस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र, याकडे ऊर्जा मंत्र्यांसह अभियांत्यांचे लक्ष जात नाही. परंतु, प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याकडे लक्ष जात आहे.

प्रत्यक्षात सेवेचाच बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे हीच काय महावितरणची दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा, असा सवाल जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून केला जात आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात वीज सेवेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. धोकादायक स्वरूपात वीजवाहिन्या, जीर्ण झालेले विद्युत खांब, झुडपांना लागणाऱ्या वाहिन्या, कलंडत असलेले विद्युत खांब आदी समस्यांच्या चक्रव्यूहात वीज ग्राहक सापडला आहे. मुळात ऊर्जा मंत्र्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक असताना दुर्लक्ष का होत आहे? असा सवाल जिल्ह्यातील वीज ग्राहक करत आहेत.

जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी दुरुस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जातो. सावंतवाडी तालुक्यातील आरोसमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर वीज वितरणच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी ताशेरे ओढले होते. वीज वितरण काय सेवा देते हे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी वाहिन्यांचा तत्काळ सर्वे करूया असे सांगताच अधिकारी मात्र स्तब्ध राहिले.

सरकार व प्रशासनास खरोखरच ग्राहकांना लोकाभिमुख सेवा पुरवायचे असेल तर मुळात विद्युत वाहिन्या व विद्युत खांब निर्धोक करा आणि मगच पुढचा विचार करा, असे काही ग्राहकांनी बोलून दाखविले.

अधिकाऱ्यांवरच देखरेखीचे प्रीपेड मीटर बसवा

आरोस गावासारखी घटना घडल्यानंतर शेकडो वीज ग्राहकांच्या एकजुटीमुळे अभियंत्यांना सुद्धा घटनास्थळी यावे लागते. मुळात हेच अधिकारी, अभियंते जर सेवेच्या सर्वेक्षणासाठी बाहेर पडले तर वीज सेवा सुरळीत होण्याची थोडीशी आशा वाटते. त्यामुळे अशा अधिकारी तसेच अभियंत्यांवरच देखरेखीसाठी प्रीपेड वीज मीटर बसवा, असे जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT