Sindhudurg Bank Election Esakal
कोकण

सिंधुदुर्ग बँकेचे बेपत्ता मतदार प्रमोद वायंगणकर घरी परतले

प्रमोद वायगंकर बेपत्ता झाल्यामुळे उलटसुलट चर्चाही रंगू लागल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील (Sindhudurg Bank Election) तळेरे विकास सेवा संस्थेचे मतदान असलेले प्रमोद वायंगणकर (Pramod Waingankar)आता आपल्या घरी परतले आहेत. आज त्यांनी येथील पोलीस ठाण्यात हजेरी लावली.आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण पुणे (Pune) येथे गेलं असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

बँक निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीतील कणकवली (Kankavli)विकास संस्था मतदार संघात मधून प्रमोद वायंगणकर यांना मतदानाचा हक्क होता, मात्र मतदाना पूर्वी 20 डिसेंबरला प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता झाले होते अशी माहिती त्यांचे भाऊ शरद वायंगणकर यांनी येथील पोलिसात नोंदवली होती.

शिवसेनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. प्रमोद वायगंकर बेपत्ता झाल्यामुळे उलटसुलट चर्चाही रंगू लागल्या होत्या. बँकेचे मतदान 30 डिसेंबरला झाले 31 ला निकाल जाहीर झाला. प्रमोद वायंगणकर हे आज येथील पोलिस ठाण्यात हजर झाले. बँकेच्या कर्जाला कंटाळून आपण पुणे येथे गेलो होतो असे त्यांनी पोलिस जबाबात म्हटले आहे. आपल्यावर कोणाचाही दबावही नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT