Barsu Refinery movement  sakal
कोकण

Barsu Refinery Ratnagiri News : माती परीक्षणाचा अहवाल दोन महिन्यांनी मिळणार

आगामी सुमारे २ महिन्यांमध्ये माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या माती परीक्षणाचे काम संपले असून, त्यामध्ये सुमारे ६७ कूपनलिका (बोअरवेल) खोदण्यात आल्या आहेत.

आगामी सुमारे २ महिन्यांमध्ये माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माती परीक्षणावेळी बारसू परिसराच्या सड्यावर तैनात करण्यात आलेला पोलिस बंदोबस्त आता हटवण्यात आला असून, त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून धुमसत असलेला हा परिसर काहीसा शांत झाला आहे.

तालुक्यातील नाणार परिसरातील लोकांच्या विरोधामुळे चर्चेत आलेला रिफायनरी प्रकल्प बारसू परिसरामध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीच्या अनुषंगाने बारसू परिसराच्या सड्यावर माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याला लोकांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर, प्रकल्प समर्थन आणि विरोध याच्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या.

त्यामुळे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून चांगलेच वातावरण तापले होते. अशा स्थितीतही प्रशासनाने पोलिस बंदोबस्तामध्ये माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये बारसू, धोपेश्वर, पन्हळेतर्फे राजापूर आदी परिसरात सुमारे ६७ ड्रील करण्यात आल्या असून, त्यापूर्वी नाटे परिसरामध्ये १८ ड्रील पूर्ण करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले असून, त्याचा सुमारे दोन महिन्यांमध्ये अहवाल प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. माती परीक्षणाचा हा अहवाल नेमका कसा येणार याकडे आता साऱ्‍यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT