bharat band not impact in closed Maharashtra mp nilesh rane criticise for shivsena 
कोकण

भारत बंद महाराष्ट्रात कुठे दिसलाच नाही

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कृषी कायद्याविरोधात भारत बंदला पाठिंब्यावरून माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. भारत बंद महाराष्ट्रात कुठे दिसला नाही, शिवसेनेचा शेती हा विषय कधीच असू शकत नाही अशी देखिल उपहासात्मक टिका माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेवर केली.


शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्यासाठी भारत बंद चे आवाहन केले होते. याबाबत भाजप प्रदेश सदस्य निलेश राणे म्हणाले, कृषी कायद्यात बदलासाठी २०१० साली शरद पवार यांनीच एक पत्र लिहून मागणी केली होती. त्यामुळे त्यानुसारच हा कायदा बदलला मात्र आता शरद  पवार  हे विरोधात का हे अनाकलनीय आहे. विरोधाला विरोध करू नका, मोदी यांनी हा कायदा आणला म्हणुन विरोध केला जातो आहे.

पंजाब राज्यात कृषी कायद्याविरोधातली तीव्रता अधिक आहेत इतर कुठल्या राज्यांमध्ये हि परिस्थिती नाही. शिवसेनेला गती नाही, शेती हा विषय सेनेचा नाही, अनेक शेतकरी संघटना मोदी साहेबांच्या सोबत मिटिंग सुरु आहेत. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ अनेक संघटनाचा पाठिंबा देत आहेत. त्यामुळे विरोधाला विरोध करू नका असा सल्ला देखिल माजी खासदार निलेश राणेंनी देवू केलाय. 


या कायद्यामध्ये शेतकऱ्यांते हित, हा कायदा मोदींना आणला म्हणुन त्याला विरोध केला जातोय. पंजाब राज्यात याची तीव्रता असल्याने आमचा पाठिंबा आमचा पाठिंबा कोणाला हा विषय किती कळला हे कोडेच असल्याची टिका निलेश राणेंनी शिवसेनेचं नाव न घेता केली. शिवसेनेची भुमिका नेहमीच बदलत आली आहे.


शिवसेनेची किंमत कमी होत चाललीय, शिवसेनेची केंद्रात चलती नाही, शिवसेना कनफ्युज पक्ष आहे. दरोरोज नवीन खोटं बोलत शिवसेनेचा उतरता प्रवास सुरु झाला आहे. हा प्रवास रोज जाणवतो. शिवसेना कुठल्या एका भुमिकेवर ठाम राहिले असं एक उदाहरण नाही, त्यामुळे शिवसेना हा अदखलपात्र पक्ष एक ना एक दिवस होणार, रोज महाराष्ट्राशी खोटं बोलतो त्याची महाराष्टाची जनता दखल घेतल्या शिवाय रहाणार नाही असा इशारा माजी खासदार निलेश यांनी दिला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT