कोकण

Bharat Bandh : पेट्रोल दरवाढीविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मोर्चा

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - पेट्रोल व डिझेल आणि सिलिंडर्सच्या दरवाढीविरोधात सोमवारी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व आरपीआय यांनी संयुक्त मोर्चा काढून निषेध नोंदवला. बैलगाडीतून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर दुकाने बंद करण्यास मोर्चेकर्‍यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही. मोर्चामुळे नाक्यानाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

काँग्रेस भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून मोर्चेकर्‍यांनी निवडणुकीत खाली खेचण्याचा इशारा दिला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार हुस्नबानू खलिफे, कुमार शेट्ये, नगरसेवक सुदेश मयेकर, बशीर मुर्तझा, अशोक जाधव, हारिस शेकासन, राजाभाऊ लिमये, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित गुरव, तसेच अन्य सहभागी पक्षांच्या नेत्यांनी केले. या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध केला. एका आंदोलकाने डोक्यावरून सिलिंडर आणला होता. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिल्यानंतर झाली.

काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली होती. मात्र तीन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असल्याने शहरातील कोणीही व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले नाही. सर्व दुकाने सुरळित सुरू होती. एसटीची वाहतूकही सुरळित सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT