कोकण

भास्कर जाधव यांच्या चिपळुणातील खासगी गाठीभेटींची चर्चा 

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या चिपळूणच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते तालुक्‍यातील जूने सहकारी आणि मित्रांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या खासगी दौऱ्यामागे दडलय काय ? ते कोणासाठी फिल्डिंग लावत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

भास्कर जाधव चिपळूणात फिरू लागले की, विरोधी पक्षापेक्षा राष्ट्रवादीतील लोकांना अधिक धडकी भरते. सुरवातीला पक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूणचा दौरा केल्यानंतर येथील नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे जाधव यांनी गुहागर मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारले. युतीच्या बालेकिल्ल्यातून ते दोनवेळा आमदार झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांवरही वर्चस्व मिळवले. आघाडी सरकरामध्ये मंत्री असताना त्यांनी मतदारसंघात अनेक कामे केली. त्याशिवाय मागील पाच वर्षात विरोधी पक्षात असतानासुद्धा सर्वाधिक निधी त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात आणला.

जाधव यांनी चिपळुणातून लक्ष काढून घेतल्यापासून येथील राष्ट्रवादीची वाताहात झाली. जाधवांबरोबर राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकत्यांची पक्षात कोंडी झाली. त्यामुळे कार्यकर्तेही पक्ष सोडून गेले. मात्र ज्यांनी जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यांचा न बोलून जाधवांनी काटा काढला. 

पायावर शस्त्रक्रिया झालेली असताना जाधवांनी सुनील तटकरेंसह आघाडीच्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे अनेक नेते निडणुकीनंतर पर्यटनाला गेले. मात्र भास्कर जाधवांनी चिपळुणात तळ ठोकला आहे. ते चिपळुणातील जून्या लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या या खासगी दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी सामील नाहीत. मात्र काही ठिकाणी त्यांनी सहकुटुंब मित्रांच्या भेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी त्यांनी सुरू केलेल्या दौऱ्याची तालुक्‍यात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत जाधव जी भूमिका घेतात त्याचा कुणाला फायदा तर कुणाला तोटा होतो. दोन्ही बाजूच्या लोकांनी जाधवांच्या खासगी दौऱ्याची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. 

मी कार्यकर्ता जपणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये रमणारा माणूस आहे. कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे. लोकसभेच्या प्रचारानंतर मिळालेला वेळ मी जून्या कार्यकर्त्यांना दिला. त्यांना भेटून जुन्या आठवणी ताजा केल्या. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. यातून मला आणि कार्यकर्त्यांनाही समाधान मिळाले. 
- भास्कर जाधव,
आमदार गुहागर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT