Bhaskar jadhav Sakal
कोकण

भास्कर जाधव निकमांमागे उभे, पण कोणत्या अर्थाने?

वक्तव्याने अनेक घायाळ; नव्या मैत्रीची समीकरणे चर्चेत

मुझफ्फर खान

चिपळूण - चिपळूण विधानसभा मतदारसंघात संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे शेखर निकम. यापुढे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी खरवते येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिली; पण जाधव, निकमांच्या मागे कोणत्या अर्थाने उभे राहणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे या दोघांमधील नव्या मैत्रीची समीकरणे समजून घेण्यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आता वेट अॅण्ड वॉच करावे लागणार आहे. वडिलांमुळे निकमांना राजकीय वारसा मिळाला; पण आमदार होण्यासाठी त्यांनाही संघर्षाला तोंड द्यावे लागले. पहिल्या निवडणुकीत पराभव झाला. दुसऱ्यावेळी परिस्थिती अनुकूल नसतानासुद्धा ते निवडून आले आणि आपले वैभव परत मिळवले. तीन वर्षात तीनशे कोटीची विकासकामे करून मतदारसंघात विक्रम केला. त्याची दखल घेत आमदार जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार रमेश कदम यांच्यासमोर निकमांचे कौतुक केले. मी गोविंदराव निकमांबरोबर राजकीय संघर्ष केला; पण आमचे कौटुंबिक संबंध कधी बिघडले नाही. मागे वेडेवाकडे काही बोललो असेन, ते विसरून जा; पण यापुढे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहेन, अशी ग्वाही दिली. या वाक्यात त्यांनी व्यासपीठावरील अनेकांना घायाळ करून सोडले.

शिवसेना, राष्ट्रवादीतील संघर्षच संपेल

हे दोन आमदार एकत्र आले तर गुहागर आणि चिपळूण मतदार संघातील शिवसेना, राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षच संपणार आहे. माजी आणि भावी आमदारांचे राजकीय भवितव्यसुद्धा या दोघांच्या राजकीय मैत्रीवर अवलंबून राहील. मात्र, पाठिंबा कसला, यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

तटकरेंनाही जाधवांकडून अपेक्षा

खासदार सुनील तटकरे यांनाही भास्कर जाधव यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. आमदार जाधव यांनी शेखर निकम यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. म्हणजे त्यांचे सहकार्य मलाही मिळणार, अशी अपेक्षा खासदार तटकरे यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवली.

शेखर निकमांचे विधिमंडळातील काम खूप चांगले आहे. विधिमंडळात एखादा प्रश्न कुणी मांडला आणि तो शेखर निकमांना आवडला तर त्याच्या बाजूला बसून त्याची विस्तृत माहिती घेण्याचे काम निकम करतात. त्यांची ही पद्धत मलाही आवडली. मी एकदा मैत्री केली आणि शब्द दिला तर दिलेला शब्द मी पाळतो, ही माझी सवय आहे. सीनियर आमदार म्हणून मी निकमांमागे खंबीरपणे उभा आहे.

- भास्कर जाधव, आमदार गुहागर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT