politics esakal
कोकण

'तटकरेंचे कोणतेच उपकार नाहीत, उलट मीच त्यांना दिल्ली दाखवली'

राजकारणात ज्यांनी तटकरेंना मदत केली, त्यांची त्यांनी माती केली; जाधवांचा घणाघात

- नागेश पाटील

राजकारणात ज्यांनी तटकरेंना मदत केली, त्यांची त्यांनी माती केली; जाधवांचा घणाघात

चिपळूण : खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःच्या कुटुबियांसाठी आणि स्वतःसाठी विधानपरिषदेची जागा घेतली. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला मिळायला हवी म्हटंल्यावर त्यांना मिरच्या का झोंबल्या कळत नाही. तटकरेंनी खोट्या कंपन्या स्थापन करून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावल्या असल्याचे आरोप झाले आहेत. तटकरेंचे माझ्यावर कोणतेच उपकार नाहीत, उलट मीच त्यांना दिल्ली दाखवली आहे. त्यामुळे जाणीव नसलेल्या या महान नेत्याला काय मार्गदर्शन करणार अशी खोचक टीका आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आमदार जाधव म्हणाले, खेड तालुक्यातील आंबडस येथील मेळाव्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत कुणबी समाजाला जागा मिळावी, अशी आपली मागणी असल्याचे म्हटले होते. यात कुणबी समाजाचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटी निधीचे समर्थन केले होते. आणखी मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला हवी म्हणताच तटकरेंना का झोंबले कळत नाही. खासदार तटकरे यांनी स्वतःसाठी, मुलग्यासाठी, पुतण्यासाठी विधानपरिषद मिळवली. घरात मुलगीसाठी मंत्रीपदही घेतले. त्यांना केवळ लोकांचे घेण्याची सवय आहे, देण्याची तर अजिबात नाही.

पुढे ते म्हणाले, नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे लावायचे आणि स्वतःमात्र कुटुंबवादी. खासदारकी, मंत्रीपद, विधानपरिषद सगळं काही आपल्या कुटुबांतच ठेवायचे, ही त्यांची मनोवृत्ती आहे. उलट कुणबी समाजाला उमेदवारी देण्याचे टाळून त्यांनी या समाजाचा अपमान केला आहे. राजकारणात ज्यांनी ज्यांनी तटकरेंना सहकार्य केलं, त्यांची तटकरेंनी माती केली आहे. केलेल्या उपकाराची त्यांना कसलीच जाणीव नाही. उलट खोट्या कंपन्या स्थापन करून त्यांनी कोट्यावधींची माया जमवली होती. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हक्काची असलेली विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला मिळावी. ही भुमिका असल्याचे मतही आमदार जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, माजी सभापती पप्या चव्हाण, फैसल कास्कर, राजू भागवत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Devang Dave: कोण आहेत देवांग दवे? विजय वडेट्टीवारंनी काय आरोप केले? निवडणूकीपूर्वी भाजप अडचणीत येणार?

Wai Voter list: 'वाईतील प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका'; काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी पक्षाने घेतली हरकत..

खुनशी हसू आणि थरार ! आम्ही दोघीनंतर प्रिया-मुक्ताचा नवा सिनेमा; पोस्टर चर्चेत

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Man With 1638 Credit Cards: बापरे! या माणसाकडे आहेत तब्बल 1,638 क्रेडिट कार्ड्स; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

SCROLL FOR NEXT