Chiplun Police esakal
कोकण

चिपळूणमध्ये भोंदूबाबासह दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले; करणी दूर करण्यासाठी महिलांकडे मागत होते 'इतके' रुपये

पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला.

सकाळ डिजिटल टीम

या प्रकाराबाबत पोलिसांनी खडसावले असता भोंदूबाबा बीअर पित असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

चिपळूण : शहरातील मार्कडी येथे भोंदूगिरी करणाऱ्या दोन भोंदूबाबांना येथील पोलिसांनी दोन महिलांच्या सहकार्याने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाबूराव वायकर (५०, रा. मुदखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव), अशोक देवराम जोशी (४०, रा. वावडी, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी पकडलेल्या दोघा संशयित भोंदूबाबांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी (Chiplun Police) दिलेली माहिती, गणेश व अशोक हे दोघेजण गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील मार्कडी येथील कुंजवन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत भोंदूगिरी करीत होते. जागरूक नागरिकांनी याची माहिती घेऊन पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. यानुसार यातील एक महिला या दोन भोंदूबाबांकडे गेली. या दोघांना आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले.

यावर या दोघांनी तुमच्यावर करणी केलेली आहे. ही करणी दूर करण्यासाठी ३० हजार रुपये लागतील तर व्यवसायात यश येण्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले. या प्रकाराने ही महिला अवाक झाली. यानंतर तिने याची माहिती आपल्या मैत्रिणीला सांगितली. यानुसार दुसरी महिला या दोघा भोंदूबाबांकडे गेली आणि तिने देखील आपल्याला यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर या दोघांनी तुम्हाला यश येण्यासाठी ५० हजार रुपये लागतील. तुम्ही पैसे घेऊन या, तुमचं काम करून देतो, असे सांगितले. हा प्रकार वेगळाच असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांनी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना सर्व माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी कुंजवन इमारतीवर या दोन महिलांसमवेत छापा टाकला. यावेळी करणी दूर करण्यासाठी लिंबूसारखे साहित्य रचून ठेवल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे भोंदूबाबांनी किचन रूममध्ये बीअर ठेवल्या होत्या. या प्रकाराबाबत पोलिसांनी खडसावले असता भोंदूबाबा बीअर पित असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि वैद्यकीय तपासणीसाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, फिर्यादीचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांवर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT