Bhutnath 64 Families Include In Food Security Scheme  
कोकण

भूतनाथमधील 64 कुटुंबांचा "अन्नसुरक्षा'मध्ये समावेश करण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - अन्नसुरक्षा योजनेंतर्गत वायरी भूतनाथ गावात काही लोकांना धान्य मिळत असून सर्व समावेशक असणाऱ्या या योजनेपासून गावातील अनेक लोक वंचित आहेत. त्यामुळे वायरी भूतनाथ गावातील इतर गरजू अशा 64 कुटुंबांचा या योजनेत समावेश होऊन त्यांना लाभ मिळावा, अशी मागणी माजी सरपंच साक्षी लुडबे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

वायरी भूतनाथ गाव हा प्रामुख्याने शेतकरी, मच्छीमार, व मोलमजुरीवर पोट भरणाऱ्यांचा गाव असून बहुतेक लोक अद्याप दारिद्रय रेषेखाली आहेत. ही वस्तुस्थिती असताना प्रत्येकाला अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणे आवश्‍यक आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास विचारणा केली असता पुढील यादीत नावे समाविष्ट होतील असे सांगितले जाते. प्रत्यक्षात यादीच लागू नाही. त्यामुळे अशा लोकांवर अन्याय होत आहे. तरी वायरी भूतनाथ गावातील कुटुंबे अन्नसुरक्षा योजनेचे सर्व निकष पूर्ण करीत असून अशा 64 कुटुंबांना ही योजना मंजूर होण्यासाठी आदेश व्हावेत, अशी मागणी सौ. लुडबे यांनी केली आहे. 

सद्य:स्थितीत शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या अन्नसुरक्षा योजनेच्या इष्टकांप्रमाणे लाभार्थी निवड पूर्ण केलेली आहे. वायरी गावातील संबंधित कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी अन्नसुरक्षा योजनेचा नवीन इष्टांक मिळणे आवश्‍यक आहे. तालुक्‍याला लागणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेच्या नवीन इष्टांकांची मागणी शासनाकडे केलेली आहे. नवीन इष्टांक प्राप्त होताच वायरी भूतनाथ गावातील कुटुंबांना योजनेत समाविष्ट केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी सौ. लुडबे यांना दिले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT