Fish Market Malvan esakal
कोकण

Fish Market Malvan : PM मोदींचा दौरा अन् नौदल दिन.. सामसूम पडलेल्या मासळी बाजारात पुन्हा मोठी गर्दी, जलक्रीडाही सुरू

सामसूम पडलेल्या मासळी बाजारात (Fish Market) काल मोठी गर्दी पहावयास मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

बंदरात नौदलाच्या युद्धनौकानी तळ ठोकल्यामुळे मागील काही दिवस किनाऱ्याजवळील मासेमारी येथील मच्छीमारांनी बंद ठेवली होती.

मालवण : नौदल दिनाच्या (Navy Day) पार्श्वभूमीवर येथील बंदरात मासेमारी नौका आणि सागरी पर्यटन व्यवसायाचे उपक्रम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता नौदल दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मच्छीमारांनी पुन्हा एकदा आपल्या नौका समुद्रात लोटून मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी सामसूम पडलेल्या मासळी बाजारात (Fish Market) काल मोठी गर्दी पहावयास मिळाली. दांडी, तारकर्ली, देवबाग येथील सागरी पर्यटन व्यावसायिकांनीही वॉटर स्पोर्ट्स केले असून किनाऱ्यांवर पर्यटक दिसू लागले आहेत. नौदल दिनामुळे सागरी सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील बंदरातील सागरी पर्यटन आणि मासेमारी बंद ठेवण्यात आली होती.

यामुळे पर्यटन (Tourism) व्यावसायिकांनी आपल्या नौका आणि वॉटरस्पोर्ट्सचे साहित्य किनाऱ्यावर आणले होते. याचा परिणाम म्हणून येथील पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. पर्यटक नसल्यामुळे किनारे ओस पडले होते. आता नौदलाच्या नौका माघारी गेल्या आहेत. तसेच शासनाकडून जाहीर केलेली बंदीची मुदत संपली असल्याने पर्यटन व्यावसायिकांनी समुद्रात आपले सागरी पर्यटनाचे उपक्रम सुरू केले आहेत. आज किनाऱ्यांवर काही प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळाली.

माशांचे दर चढे राहण्याची शक्यता

येथील बंदरात नौदलाच्या युद्धनौकानी तळ ठोकल्यामुळे मागील काही दिवस किनाऱ्याजवळील मासेमारी येथील मच्छीमारांनी बंद ठेवली होती. यामुळे येथील मासळी बाजारात मासळीची आवक घटली होती. मासळी बाजारात शुकशुकाट दिसत होता. (ता.५) बंदरातील मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जावू लागल्यामुळे आज मासळी बाजारात मोठी गर्दी पहावयास मिळाली. मासेमारी सुरू झाली असली तरीही माशांचे दर काही दिवस चढे राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT