Anil Parab  
कोकण

Anil Parab Sai Resort: अनिल परब यांना मोठा धक्का! साई रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

Demolition of Sai Resort in Dapoli: अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत.

कार्तिक पुजारी

रत्नागिरी- दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब यांचा या मुद्द्यावरुन कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा उबाठा नेते अनिल परब यांच्यासाठी मोठा धक्का आहे. (Anil Parab High Court orders demolition of Sai Resort in Dapoli)

मागे खेड जिल्हा कोर्टाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र आणि राजकीय नेते सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक नियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ड पाडण्याचे आदेश दिले होते.

राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली होती. यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT