The bike went through the flood vegurle taluka  
कोकण

किती निष्काळजीपणा! पुरातून जाणे आले अंगलट

दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील परबवाडा आडारी येथील संजय फर्नांडिस यांच्या घरासमोरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. दरम्यान, येथून जाणाऱ्या उभादांडा नमसवाडी येथील प्रशांत सदाशिव साळगावकर यांची दुचाकी वाहून गेली; मात्र वेळीच ते गाडीवरून उतरल्याने बचावले. 

तालुक्‍यातील नमसवाडी येथील श्री. साळगावकर हे आपल्या कामानिमित्त या पुलावरून जात होते. त्याच दरम्यान पाऊस खूप झाल्याने आडारी येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने साळगावकर यांनी दुचाकी पुढे नेली; मात्र पाण्याच्या प्रवाहापुढे दुचाकीचा टिकाव लागला नाही. वेळीच साळगावकर यांनी दुचाकीवरून उडी मारल्याने अनर्थ टळला.

ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता त्यांना व गाडीला सुखरूप बाहेर काढले. या प्रसंगाने साळगावकर यांना प्रचंड मानसिक त्रास झाला असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या पुलाचे मागील निवडणुकीवेळी उद्‌घाटन झाले असून अद्याप हा धोकादायक पूल बांधलेला नाही. लोकांना आश्‍वासन देऊन निवडणुकीत प्रचंड मतदान मात्र सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. नवीन पूल तत्काळ उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT