billy goat legs demanded by a people during lockdown period in ratnagiri 
कोकण

प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नव्या फंड्यात खवय्यांची बकऱ्याचे पाय आणि मुंडीला पसंती

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : कोरोनामुळे लोक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नवनवे फंडे आजमावताना दिसत आहेत. याचा मार्केटवरही परिणाम दिसू लागला आहे. सिंधुदुर्गात अशा मानसिकतेमुळे अनेकजण मटणापेक्षा बकऱ्याच्या पायाला व मुंडीच्या खरेदीसाठी मटण मार्केटमध्ये गर्दी करू लागले आहेत. यामुळे याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत.

सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच नागरिकांकडून कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उपाययोजना होताना दिसत आहे. कोरोनाला लांब ठेवण्यासाठी मिळेल तो उपाय करत आहेत. त्यातच बकऱ्याच्या मटणापेक्षा बकऱ्याचा पाय आणि मुंडीचा सूप पिला तर कोरोना पळतो, असा समज धरून अनेकजण मटणापेक्षा बकऱ्याच्या पायाला व मुंडीच्या खरेदीसाठी मटण मार्केटमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत. 

एरव्ही मटण विक्रेत्यांना मुंडी व पायासाठी ग्राहक शोधावे लागत होते; पण आता आदल्या दिवशी फोन लावून नंबर लावताना दिसत आहे. कोरोना काळात अनेक धंदे तेजीत आले असतानाच याही एका व्यवसायाला वाट मिळवून दिल्याचे चित्र आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT